mumbai mahotsav

‘जीवनाधार फाउंडेशन’ ही मुंबईतली सेवाभावी संस्था आहे. जी सलग तीन दिवस मुंबई महोत्सवाचे (Mumbai Mahotsav)आयोजन करीत असते. यंदा या महोत्सवाचे सहावे वर्ष आहे.

    मुंबई: मुंबई म्हणजे जागतिक पर्यटन स्थळ, भारताचे वैभव, कष्ट करणाऱ्यांची स्वप्ननगरी, श्रीमंतांचे उद्योग स्थळ ही महती काही आजची नाही. पूर्वापार मुंबईची ही ख्याती अबाधित राहिलेली आहे. त्याचे श्रेय तेथे राहणाऱ्या मोठ्या मनाच्या प्रज्ञावंतांना द्यावे लागेल. या सर्वांच्या कर्तृत्वामुळे मुंबईची शान ही जगभर आबादीत राहिलेली आहे. ‘जीवनाधार फाउंडेशन’ ही मुंबईतली सेवाभावी संस्था आहे. जी सलग तीन दिवस मुंबई महोत्सवाचे (Mumbai Mahotsav) आयोजन करीत असते. यंदा या महोत्सवाचे सहावे वर्ष आहे.

    सांस्कृतिक कार्यक्रमा सोबत मुंबईच्या प्रगतीसाठी अनमोल योगदान देणाऱ्यांचा दिग्गजांचे पुरस्कार देऊन सन्मान हे या महोत्सवाचे खास आकर्षण आहे. मुंबै भूषण, मुंबै गौरव आणि मुलखावेगळी माणसं अशा विभागात महनीय व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.

    यंदा मुंबै भूषण पुरस्काराचा मान मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना जाहीर झालेला आहे. जीवनाधार जीवनगौरव पुरस्काराने अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी यांना गौरविण्यात येणार आहे. तर मुंबै गौरव पुरस्कारासाठी उद्योजक विठ्ठल कामत, सांस्कृतिक विभागासाठी अभिनेत्री, नृत्यांगना मेघा घाडगे यांची निवड झालेली आहे. याशिवाय संजय राऊत (खासदार), सुनील प्रभू (आमदार ),स्नेहल आंबेकर (नगरसेविका), अजय फणसेकर (चित्रपट), अशोक समर्थ (मालिका) , संतोष पवार (नाटक ), जयू भाटकर (प्रसारण माध्यम), प्रसाद मोकाशी (पत्रकार), प्रसाद काथे (माध्यम पत्रकार), सुशील मुणगेकर (शिक्षण), डॉ. शर्मिला जाधव (वैद्यकीय), मधु शेट्ये (क्रीडा), अश्विनी मलिक मेश्राम (सामाजिक), अभिजीत मोकाशी (युवा प्रेरणा) ‘मुलखावेगळी माणसं’ या पुरस्कारासाठी गोपाळ खाडे, विनोद साडविलकर यांची निवड करण्यात आलेली आहे. मुंबईतील श्रमिक व मान्यवरांचे एक संमेलन या निमित्ताने घडवून आणता येते.

    यावर्षी दि. १,२ आणि ३ जानेवारी २०२३ रोजी. शिवाजी मंदिर, दादर येथे रात्री ८ ते ११ या वेळेत हा ‘मुंबै महोत्सव’ संपन्न होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नमन नटवरा, मुंबई. निर्मित ‘माझा महाराष्ट्र’ हा प्रयोग सादर होईल. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या आर्ट प्रस्तुत आंतरराष्ट्रीय किर्तीचे कलावंत ‘अरुण पेदे वेसावकर आणि मंडळी’ कोळी गीतांची धमाल उडवतील, तिसऱ्या आणि समारोपाच्या दिवशी नमन नटवरा, मुंबई निर्मित ‘लावण्य जलसा’ हा लावणीचे सांस्कृतिक दर्शन घडवणारा प्रयोग सादर होईल. एकता मंच, साई वारी मंडळ, वडाळा गाव, वामनराव महाडिक मित्र मंडळ, कृष्णाई सेवा संघ यांचे विशेष सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे. हा सोहळा २ कॅमेरा तंत्राने फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब लाईव्ह या पद्धतीने दाखवला जाणार आहे.

    या पुरस्कार वितरण सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जीवनाधार फाउंडेशनचे अध्यक्ष आणि उद्योजक राजेश खाडे यांची संकल्पना असलेल्या या मुंबई महोत्सवास अमोल गजानन कीर्तिकर, प्रिं.अजय कौल, प्रशांत काशीद, गोपाळ शेलार यांच्या सह जीवनाधार फाउंडेशनची विश्वस्त समिती यांचे सहकार्य लागले आहे. शिल्लक सन्मानिकांसाठी प्रत्येक कार्यक्रमाच्या दिवशी एक तास अगोदर सन्मानिका विनामूल्य उपलब्ध असणार आहेत.