
भुदरगड तालुक्यातील एका गावात २०१६ मध्ये पीडित मुलीच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य आरोपी सुनील सुतार याने केले होते. जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने तीन-चार वेळा बलात्कार केला होता. याबाबत भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
भुदरगड : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बन आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरी आणि छात साडेसत्तावीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. सुनील शिवाजी सुतार (वय ३२, रा. धामणे, ता. आजरा. जि. कोल्हापूर, सध्या रा. बेगवडे. ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी ही शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
भुदरगड तालुक्यातील एका गावात २०१६ मध्ये पीडित मुलीच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य आरोपी सुनील सुतार याने केले होते. जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने तीन-चार वेळा बलात्कार केला होता. याबाबत भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी तपास करून सुनील सुतारवर गुन्हा दाखल केला. अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयात विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. फिर्यादी, पीडित मुलगी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षीही महत्त्वाच्या ठरल्या.
साडेसत्तावीस हजार रुपयांचा दंड
दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश तिडके यांनी सुनील सुतारला दोषी ठरविले. त्याला वीस वर्षे सक्तमजुरी व साडेसत्तावीस हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. तत्कालीन तपास अधिकारी अरविंद चौधरी, न्यायालय पैरवी अधिकारी पोलिस कॉन्स्टेबल माधुरी कांबळे, पोक्सो पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल माधवी घोडके यांनी विशेष सरकारी वकिलांना सहकार्य केले.