भंडारा सामुहिक बलात्कार प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी 200 पोलिसांची नेमणूक

भंडारा सामुहिक बलात्काराच्या घटनेतील पिडीतेसोबत तिची वैद्यकीय अवस्था पूर्णपणे बरी नसल्यामुळे पोलिसांचे (Police) बोलणे झालेले नाही, अथवा तिचा जबाबही नोंदवण्यात आलेला नाही. प्रकरणाच्या तपासात आणखी आरोपींचा सहभाग समोर आल्यास त्यांनाही अटक केली जाईल.

    भंडारा : भंडारा जिल्हा सामुहिक बलात्कार (Bhandara Gang Rape) प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या फरार आरोपीला शोधण्यासाठी 12 पथकं तयार करण्यात आली असून 200 पोलीस कर्मचारी या पथकात तैनात करण्यात आले आहे.

    भंडारा सामुहिक बलात्काराच्या घटनेतील पिडीतेसोबत तिची वैद्यकीय अवस्था पूर्णपणे बरी नसल्यामुळे पोलिसांचे (Police) बोलणे झालेले नाही, अथवा तिचा जबाबही नोंदवण्यात आलेला नाही. प्रकरणाच्या तपासात आणखी आरोपींचा सहभाग समोर आल्यास त्यांनाही अटक केली जाईल. शिवाय या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते, असे संकेत पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. भंडारा जिल्ह्यात घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती आता या प्रकरणाच्या तपासाला वेग येताना दिसतोय.