Online fraud committed in the name of Fasttrack Renewal, Rs 1 Lakh

कोरेगांव पार्क पोलिसांकडून दलालास अटक

    पुणे : दुचाकींचा विमा मोटारींच्या नावाने उतरवुन विमा कंपनीसह वाहन चालकांची फसवणूक केल्याप्रकरणात पसार असणाऱ्या दोन दलालांना पोलिसांनी अटक केली. अनंत राघू कचरे (रा. एनआयबीएम रोड), अजित अशोक सावंत (वय २९ रा. भाकरेवाडी, सोलापूर, सध्या रा.पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी स्वानंद जगदीश पंडित (वय ४१, रा. बंडगार्डन रस्ता) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

    आरोपींनी ऑनलाइन पद्धतीने वाहन प्रकारात बदल करुन तीनचाकी, चारचाकी वाहने दुचाकी असल्याचे भासवून फसवणूक केली. त्यांनी तब्बल २ हजार २८६ मोठ्या वाहनांना दुचाकी वाहने दाखवून आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीची कोट्यवधीं रुपयांची फसवणूक केली. तसेच शासनाकडे कर देखील जमा केला नाही. पंडीत विमा कंपनीत तपासणी अधिकारी आहेत. पंडीत यांनी विमा पॉलिसीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना हा प्रकार लक्षात आला. विमा कंपनीने सखोल चौकशी केली असता या दोघा दलालांनी अशा प्रकारे सव्वा दोन हजार वाहने दुचाकी असल्याचे भासवून विमा काढला होता. दलालांनी मोटारचालकांकडून विमा उतरविण्यासाठी पैसे घेतले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कचरे आणि सावंत पसार झाले होते. दोघांना अटक करण्यात आली.