
साक्ष देताना, आधीच लिहून ठेवलेल्या जबाबावर आपल्याला स्वाक्षरी करायला तपास अधिकाऱ्याने भाग पाडले, जबाबावर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्यावर हल्ला केला, छळ केला. त्यानंतर आपली जबाबावर स्वाक्षरी घेण्यात आली. ही स्वाक्षरी करून घेण्यासाठी आपल्याला १८ ते २० दिवस ताब्यात ठेवण्यात आल्याचा दावा साक्षीदाराने केला.
मयुर फडके, मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी (Malegaon Bomb Blast Case) सुरू असलेल्या खटल्यादरम्यान साक्षीदार फितूर होण्याचे सत्र सुरू (The session of witness deposition begins) असून बुधवारी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (BJP MP Pragya Singh Thakur) यांच्याशी संबंधित साक्षीदाराने त्यांना ओखळत नसल्याचे सांगितले. त्यामुळे या साक्षीदाराला तपास यंत्रणेच्या विनंतीनंतर विशेष न्यायालयाने (Special Court) फितूर घोषित केले. या साक्षीदारामुळे खटल्यातील फितूरांची संख्या ३१ झाली आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या मध्यप्रदेश येथील खासदार आहेत. संबंधित साक्षीदारही तेथील रहिवाशी आहे. या साक्षीदाराची बुधवारी साक्ष नोंदवण्यात आली. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) प्रकरणाचा सुरुवातीचा तपास केला होता व या साक्षीदाराचा जबाब एटीएसने नोंदवला होता. त्याच्या जबाबातील तपशील वैयक्तिक स्वरूपाचा असून त्याने दिलेल्या माहितीनंतरच पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे, असे विशेष सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले.
साक्ष देताना, आधीच लिहून ठेवलेल्या जबाबावर आपल्याला स्वाक्षरी करायला तपास अधिकाऱ्याने भाग पाडले, जबाबावर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्यावर हल्ला केला, छळ केला. त्यानंतर आपली जबाबावर स्वाक्षरी घेण्यात आली. ही स्वाक्षरी करून घेण्यासाठी आपल्याला १८ ते २० दिवस ताब्यात ठेवण्यात आल्याचा दावा साक्षीदाराने केला. हा साक्षीदार प्रकरणातील फरारी आरोपी रामजी कालसंग्रा याचा नातेवाईक असल्याचा खटल्याचा आता तपास करणाऱ्या एनआयए दावा आहे.
२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनेकजण सध्या जामीनावर बाहेर आहेत.