मराठा आरक्षणासाठी पुन्हा एका तरुणानं दिला जीव, हिंगोलीत 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

या तरुणाने गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गोविंद कावळे याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती

    महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation )आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असून आता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना हिंगोलीच्या नहाड गावातून समोर आली आहे. हिंगोलीत 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. नाणार गावातील 21 वर्षीय गोविंद कावळे यांनी मराठा आरक्षणासाठी पत्र लिहून आत्महत्या केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गोविंद कावळे याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत लिहिले आहे की, ‘मी माझ्या शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. तरीही महाराष्ट्र सरकार आम्हाला मराठा आरक्षण देत नाही. म्हणूनच मी आत्महत्या करत आहे.सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

    आतापर्यंत अनेक जणांनी दिला जीव

    मराठा आरक्षणासाठी मंगळवारी तीन तरुणांनी आत्महत्या केली. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करणारांची संख्या वीस पेक्षाही जास्त झाली आहे.

    परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात असलेल्या मैराळ सावंगी येथील अशोक रंगनाथ जाधव (30) या तरुणाने नदीत उडी मारून आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथे सोपान बाबूराव कचरे (30) याने मराठा आरक्षणासाठी विहिरीत उडी घेतली. तर, छत्रपती संभाजीनगर शहरातील पिसादेवी भागातील शुभम अशोक गाडेकर या तरुणानेही मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करत गळफास घेतला