इंदापूरच्या विकासकामांसाठी २२ कोटी मंजूर; हर्षवर्धन पाटील यांची माहिती

पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये २२ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

    इंदापूर : पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये २२ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

    हर्षवर्धन पाटील म्हणाले की, भाजप-बाळासाहेबांची शिवसेना गटाची राज्यात सत्ता आल्यानंतर इंदापूर तालुक्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने आपण निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि.२४) इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये २२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पुढील काळातही भाजप व बाळासाहेबांची शिवसेना सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी व विकास कामे इंदापूर तालुक्याला मिळणार आहेत.