मराठा आरक्षणाची धग कायम, पुण्यात 22 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं; सुसाइड नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय ?

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आळंदी जवळील चिंबळी येथे घडली आहे.  आरक्षणासाठी सिद्धेश सत्यवान बर्गे या 22 वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. आरक्षणाचे कारण स्पष्टपणे चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

    पिंपरी : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आळंदी जवळील चिंबळी येथे घडली आहे. आरक्षणासाठी सिद्धेश सत्यवान बर्गे या 22 वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. आरक्षणाचे कारण स्पष्टपणे चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
    चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलंय?
    मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोनआठवड्यात आरक्षणाच्या मागणीसाठी 28 जणांनी आपले आयुष्य संपवले आहे. यावेळी सिद्धेश बर्गे यांनी आरक्षणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. चिट्टीतील मजकुरात ‘मी कोणाच्या त्रासाला कंटाळुन नाही, तरशासकीय कार्यपद्धतीला कंटाळुन आत्महत्या करत आहे. मराठा आरक्षण मिळावे अशी माझी इच्छा आहे, मराठा बांधवांसाठी हे पाऊल उचलत आहे’. असा उल्लेख चिठ्ठीमध्ये करण्यात आला आहे.
    घटनेने परिसरात खळबळ
    या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही चिट्टी सर्वत्र सामाजमाध्यमांमधून व्हायरल झाली आहे. तथापि, मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे उपोषण केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी लोकांना आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची हिंसा अथवा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.