शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकरांच्या शेतात 24 तास वीज, शेतकऱ्याच्या नशिबी लोडशेडिंग

शेतकरी लोडशेडिंगने हैराण झालेला असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या शेतात मात्र 24 तास वीज उपलब्ध आहे. मात्र, त्याच भागातील शेतकऱ्याच्या नशीबी मात्र दुर्दैवाने भारनियमन आले आहे. त्या शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड वीज मिळते. खासदार तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असून या दुजाभावमुळे शेतकरी मात्र पुरता वैतागला आहे(24 hours power to MPs, farmer's fate loadshedding).

    उस्मानाबाद : शेतकरी लोडशेडिंगने हैराण झालेला असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या शेतात मात्र 24 तास वीज उपलब्ध आहे. मात्र, त्याच भागातील शेतकऱ्याच्या नशीबी मात्र दुर्दैवाने भारनियमन आले आहे. त्या शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड वीज मिळते. खासदार तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असून या दुजाभावमुळे शेतकरी मात्र पुरता वैतागला आहे(24 hours power to MPs, farmer’s fate loadshedding).

    तेरणा येथील एक्सप्रेस फिडरवरून डीपी टाकण्यात आला असून या फिडरच्या माध्यमातून ओमराजे यांच्यासह काही शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली जात आहे, तर त्याच भागातील काही शेतकऱ्यांना मात्र वीज मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधी व सामान्य शेतकरी असा दुजाभाव होत असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. आम आदमी पार्टीने ओमराजे यांना 24 तास वीज मिळत असल्याचा आरोप केला आहे.

    खासदार तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असून या दुजाभाव मुळे शेतकरी वैतागला आहे, तर खासदार ओमराजे यांचे प्रकरण असल्याने अधिकारी याबाबत बोलण्यास टाळाटाळ करित आहेत. शेतात पाणी असले तरी केवळ वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही, दिवसरात्र विजेची वाट पाहावी लागत आहे.