२५० ब्रिटिशकालीन पुलांवरून जीवघेणा प्रवास; संरक्षणात्मक लेखापरीक्षणाचा प्रश्न

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत १४ तर संपूर्ण राज्यात २५६ शंभरी भरलेले जुने पूल आहेत. यातील काही पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे तर काही नव्याने बांधण्यात आले आहेत. तर मुंबईची परिस्थिती पाहता सीएसएमटी येथील हिमालया पूल दुर्घटनेनंतर पालिकेने ३५० पुलांची तपासणी केली होती. त्यातील १४ पूल धोकादायक असल्याने ते पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बनवण्याचा निर्णय घेतला. यातील बहुतांश पूल हे दक्षिण मुंबईतील असून ब्रिटिशकालीन आहेत.

    मुंबई – दक्षिण मुंबईत (South Mumbai) सर्वाधिक ब्रिटिशकालीन पूल (British Era Bridge) आहेत. मात्र अंधेरी पूर्व पश्चिम जोडणाऱ्या अंधेरीतील गोखले पुलाला (Gokhale Bridge) धोकादायक ठरवत, ७ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आला. बंद पूलामुळे अंधेरी पूर्व पश्चिम प्रवासाला अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अन्य देखील ब्रिटिशकालीन पुलांच्या संरक्षणात्मक लेखापरीक्षणाचा (Defensive Audit) प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मुंबईसह राज्यभरात असलेल्या सुमारे २५० हुन अधिक ब्रिटिशकालीन पुलांना शंभर वर्षे पूर्ण झाली असून त्यातील काहींची डागडुजी (Maintenence) करण्यात आली आहे, मात्र अजूनही ब्रिटिश कालीन पुलांवरून प्रवासी जीवावर उदार होऊन प्रवास करत असल्याचे सांगत या सर्व फुलांचे स्ट्रक्चर ऑडिट (Structural Audit) करा अशी मागणी वॉच डॉग फाउंडेशनचे संस्थापक गॉड पिमेंटा यांनी केली.

    गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेनंतर ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत १४ तर संपूर्ण राज्यात २५६ शंभरी भरलेले जुने पूल आहेत. यातील काही पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे तर काही नव्याने बांधण्यात आले आहेत. तर मुंबईची परिस्थिती पाहता सीएसएमटी येथील हिमालया पूल दुर्घटनेनंतर पालिकेने ३५० पुलांची तपासणी केली होती. त्यातील १४ पूल धोकादायक असल्याने ते पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बनवण्याचा निर्णय घेतला. यातील बहुतांश पूल हे दक्षिण मुंबईतील असून ब्रिटिशकालीन आहेत. गेल्या सात त्यातील चार पूल पाडण्यात आले. शहरात खराब अवस्थेतील भायखळा सॅन्डहर्स्ट रोड पूल,दादर टिळक आणि भायखळा येथील वाय ब्रिज पुलाचे कामला मंजुरी मिळाली आहे. हे काम देखील लवकरच सुरू करण्यात येणार असून सुमारे ८०० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हिमालय पुलाची दुर्घटना असो किंवा गुजरातमधील मोरबी पुलाची दुर्घटना, त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन काही फायदा नाही, असे सांगत पिमेंटा यांनी जुन्या पुलांच्या ऑडिटची मागणी केली
    आहे.
    वॉच डॉग फाउंडेशनने सरकारचे लक्ष वेधले
    महाराष्ट्र राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी २०२० मध्ये राज्य विधानसभेला सादर केलेल्या अहवालात करण्यात आली आहे. केवळ दक्षिण मुंबईतच १० ब्रिटिशकालीन उड्डाणपूल असून त्या ठिकाणी तातडीने नवीन उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. तर राज्यातील सर्व पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी पिमेंटा यांनी केली.