वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा साखळी उपोषणाचा 25 वा दिवस, प्रशासनाचं मात्र अदयाप दुर्लक्ष

गेल्या 25 दिवसांपासून सदरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू आहे. मात्र,  प्रशासन याबाबत गंभीर नसून या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी उपोषण करणाऱ्या महिलांनी केली आहे.

    औंरगाबाद : शहरातील घाटी रुग्णालय परिसरातील प्रशासकीय इमारतीसमोर महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा साखळी उपोषणाचा आज 25 व्या दिवस आहे. मात्र याकडे प्रशासनाने आजपर्यंत कोणतीच दखल घेतली नाही. अशी माहिती उपोषणाला बसलेल्या कंत्राटी कर्मचारी महिलांनी सदिली आहे.

    कोरोना संसर्ग काळापासून या कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयात वैद्यकीय सफाई कर्मचारी म्हणून काम केले असून सदरील वीस जणांना कामावरती घेण्यात आले होते. यापैकी सर्वांना कामावरून काढण्यात आले आहे. यापैकी दहा जणांना कामावर घेतले असून मात्र उरलेल्या दहा जणांना ठेकेदाराने यांना कामावर घेतले नाही. या सफाई कर्मचारी यांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 25 दिवसांपासून सदरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू आहे. मात्र,  प्रशासन याबाबत गंभीर नसून या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी उपोषण करणाऱ्या महिलांनी केली आहे.