२६/११ चा हल्ला केवळ मुंबईवर नव्हेतर मानवतेवरचा हल्ला; देवेंद्र फडणवीस

२६/११ हा केवळ मुंबईवर नाही, भारतावर नाही, तर संपूर्ण मानवतेवर झालेला हल्ला. २६-११ आजच्या दिवशी भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. जो सार्वभौमत्वावर हल्ला होता. या हल्ल्या दरम्यान मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणी टार्गेट करण्यात आले होते.

    मुंबई, दहा दहशतवाद्यांनी तेरा वर्षापूर्वी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ल्या केला. या भ्याड हल्ल्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोकांनी आपले सर्वस्व गमवावे लागले.

    या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आदरांजली वाहताना. भाजपाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शहिदांना आदरांजली वाहणारी चित्रफित व्टिट केली आहे.

    भारतावर नव्हे संपूर्ण मानवतेवर हल्ला
    फडणवीस यांनी म्हटले आहे की, २६/११ हा केवळ मुंबईवर नाही, भारतावर नाही, तर संपूर्ण मानवतेवर झालेला हल्ला. २६-११ आजच्या दिवशी भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. जो सार्वभौमत्वावर हल्ला होता. या हल्ल्या दरम्यान मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणी टार्गेट करण्यात आले होते. ज्याच्या आधारे केवळ मुंबईलाच नाही तर संपूर्ण आंतराष्ट्रीय समाजाला पराजित करण्याचे लक्ष्य होते.

    आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाही.
    ज्या प्रकारे हा हल्ला झाला होता. तो कोणालाच विसरता येण्यासारखा नाही. २६-११ हल्ला जेव्हा झाला. तेव्हा नागरिकांनी संपूर्ण भारतावरील हल्ला मानला होता. यानंतर आंतराष्ट्रीय समाज देखील हेच मानतो, की हा हल्ला केवळ भारतातच नाही, तर परराष्ट्रात देखील अशाप्रकारे हल्ले होत आहेत.

    हा हल्ला मानवतेवर तसेच संपूर्ण आंतराष्ट्रीय समुदायावर होत आहे. आपल्या सर्वांना मिळून या विरोधात लढावे लागेल. आणि माझा विश्वास आहे, की यामुळे मानवता जिंकेल, आणि आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाही. याप्रसंगी या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस अधिकारी आणि जनतेला नमन करतो असे फडणवीस यांनी म्हटले आहे.