२६ बेघर कुटुंबाचं शिरपूर नगरपालिकेत समोर आजपासून आमरण उपोषण

या जागेचे भुमिपूजन देखील करण्यात आले आहे. त्या जागेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 26 कुटूंबीयांना योजनेत समावेश होऊ शकतो. मात्र प्रत्येकी 9 लाख 50 हजार खर्च लागेल असे सांगण्यात आल्याने त्या 26 बेघर कुटूंबीयांनी ते मान्य नसल्याचे म्हणटलं आहे.

    धुळे : अतिक्रमणात बेघर झालेल्या २६ कुटूंबीयांनी शिरपूर नगरपरिषदेबाहेर आजपासून आंदोलनाचं शस्त्र उपसलं आहे. २०१७ साली २६ कुटूंबीयांचे अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी निवेदन देऊनही शासन दुर्लक्ष करण्यात आल्याने पुन्हा या कुटुंबीयांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन सुरु केले आहे.

    शिरपूर शहरातील आदर्श नगरपरिषदेच्या उपजिल्हा रुग्णालय मागच्या बाजूस 25 ते 30 वर्षांपेक्षा जास्त काळापासून रहिवास असलेले घर 2017 साली शिरपूर नगरपरिषदेच्या 26 कुटूंबीयाच्या घरांवर अतिक्रमणाचा हातोडा मारण्यात आला होता. त्यानंतर त्या 26 कुटूंबींयानी आले संपूर्ण बिर्हाड घेऊन शिरपूर नगरपरिषदेबाहेर धरणे आंदोलन केले होते.

    तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी अर्ज व तक्रार देवुन घरांचे पुनर्वसन झाले नाही. 2017 पासून गेल्या पाच वर्षात या 26 कुटूंबीयांना नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी व राजकीय पुढारी यांचे तोंडी व लेखी आश्वासन देण्यात आले आहेत. मान्यता जागा नियुक्त झाल्यास पुर्नवसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. शिरपूर शहरातील रिक्रेशन गार्डनच्या शेजारी बेघरांसाठी जागा मंजूर असतांना व घर बांधण्यासाठी परवानगी मंजूर करण्यात आली आहे.

    या जागेचे भुमिपूजन देखील करण्यात आले आहे. त्या जागेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 26 कुटूंबीयांना योजनेत समावेश होऊ शकतो. मात्र प्रत्येकी 9 लाख 50 हजार खर्च लागेल असे सांगण्यात आल्याने त्या 26 बेघर कुटूंबीयांनी ते मान्य नसल्याचे म्हणटलं आहे.