मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवादी झाले होते ठार; २० पुरुषांसह ६ महिला नक्षलवाद्यांचा समावेश

गडचिरोली जिल्ह्यातील आपत्ती चकमकीत टिपल्या गेलेल्या नक्षल्याचे मृतदेह गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. या सर्व मृतदेहांच्या कोरोना चाचण्या करून शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती आहे. वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. २६ मृत नक्षलयांमध्ये २० पुरुष व सहा महिला नक्षल्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

    गडचिरोली (Gadchiroli) : शनिवारी नक्षलविरोधी कारवाईत गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाला आहे. त्यासह २६ नक्षलवाद्यांच्या नावांची यादी समोर आली आहे. कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या C-६० पथकाच्या जवानांनी शनिवारी हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. यामध्ये तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. आता या ठार झालेल्या नक्षलवाद्यांची यादी समोर आली आहे. या २६ नक्षलवाद्यांमध्ये एकूण २० पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे.

    गडचिरोली जिल्ह्यातील आपत्ती चकमकीत टिपल्या गेलेल्या नक्षल्याचे मृतदेह गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. या सर्व मृतदेहांच्या कोरोना चाचण्या करून शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती आहे. वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. २६ मृत नक्षलयांमध्ये २० पुरुष व सहा महिला नक्षल्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. यातील १६ नक्षलवाद्यांची ओळख पटली असून १० जण अनोळखी आहेत. हे सर्व १० लोक मिलिंद तेलतूंबडेच्या माध्यमातून दलममध्ये नव्याने भर्ती करण्यासाठी आणलेले रिक्रुट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    सर्व ओळख पटलेले मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती जंगल परिसरात झालेल्या या चकमकीत राज्यातील नक्षल चळवळीचा सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह तीन मोठे नक्षल नेते मृत झाल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यासाठी मोठी तयारी चालविली आहे.