
वल्लभनगर आगारात मोठा पोलीस बंदोबस्त
आगारात प्रवासी कमी आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची संख्या जास्त होती.
जालना, बीड या परिसरात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बंद पाळला जात आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीसाठी आगारातून जालना मार्गे सुटणारी ही बस बंद ठेवण्यात आली. नागरिक पर्यायी मार्गांचा निवड करत, बस बदलत गाव गाठत आहेत. तर, पंढरपूरला बस जाळण्यात आल्याने त्या मार्गावरील बसही बंद ठेवल्याचे आगारप्रमुख संजय वाळवे यांनी सांगितले.
-पुण्यातून जाणाऱ्या एसटी बसेसच्या पावणेआठशे फेऱ्या रद्द, मराठवाडा, विदर्भाकडे जाणाऱ्या बस जागेवरच उभ्या
पुणे मराठा आरक्षणाबाबत राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव या भागांत पुण्यातून सोडण्यात येणाऱ्या एसटीच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुण्यातून दररोज १ हजार ५५६ नियोजित बस फेऱ्या आहेत. त्यामध्ये बुधवारी (दि.१) आंदोलनामुळे ७७० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने बीडसह अमरावती, नागपूर, सोलापूर मार्गांवरील फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती पुणे एसटी महामंडळाने दिली.