लोन मंजूर करण्याच्या बहाण्याने २८ लाखांची फसवणूक

सरकारी बँकेतील पॅनेलवर कन्स्लटंट असल्याचे सांगत लोन मंजूर करण्याच्या बहाण्याने एकाची २८ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पैशांची मागणी केली असता शिवीगाळ करुन बघुन घेण्याची धमकीही दिली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मिलींद दादाजी फुटाणे (वय ४९, रा. कोथरुड) यांनी तक्रार दिली आहे.

    पुणे : सरकारी बँकेतील पॅनेलवर कन्स्लटंट असल्याचे सांगत लोन मंजूर करण्याच्या बहाण्याने एकाची २८ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पैशांची मागणी केली असता शिवीगाळ करुन बघुन घेण्याची धमकीही दिली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मिलींद दादाजी फुटाणे (वय ४९, रा. कोथरुड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरुन विनोद रवींद्र शेंडगे, अक्षय विनोद शेंडगे, प्रशांत भालचंद्र बंडेवार, रोहन चंद्रशेखर मेटकरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २ सप्टेंबर २०२२ ते २३ एप्रिल २०२३ या कालावधीत अॅडव्हान्स कॅड टेक्नोलॉजीस प्रा. लि. येथे घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघेही अॅडव्हान्स कॅड टेक्नोलॉजीस प्रा. लि. काम करतात. सरकरी बँकेतील पॅनेलवरील कन्स्लटंट असल्याचे त्यांनी तक्रारदार मिलींद यांना सांगितले. सरकारी बँकेतून लोन मंजूर करुन देऊ असे सांगत विश्वास संपादन केला. लोन मंजूर करुन देण्याच्या बहाण्याने फुटाणे यांच्याकडून २८ लाख २२ हजार ४०० ऑनलाईन व रोख स्वरुपात घेतले. मिलींद फुटाणे यांनी पैसे दिल्यानंतर लोनबाबत विचारणा केली. मात्र, लोन मंजूर करुन न देता त्यांची फसवणूक केली. पैसे परत मागितले असता टाळाटाळ करुन त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. तसेच पुण्यातून हुसकावून लावण्याची व बघुन घेण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.