289 झेडपी शिक्षक अपात्र! 170 जणांना मिळणार पदोन्नतीचा लाभ

समुपदेशना पूर्वीचं प्राथमिक शिक्षण विभागाने 289 झेडपी शिक्षकांना पदोन्नती लाभा पासून आपात्र करण्यात आले आहे. सोमवारी 893 शिक्षकांचे ऑनलाईन द्वारे समूपदेशन घेण्यात येणार आहे. या पैकी 170 शिक्षकांना पदोन्नती आदेश देण्यात येणार असल्याची माहीती प्राथमिक शिक्षणधिकारी संजय जावीर यांनी 'नवराष्ट्र'शी बोलताना दिली.

    शेखर गोतसुर्वे, सोलापूर : समुपदेशना पूर्वीचं प्राथमिक शिक्षण विभागाने 289 झेडपी शिक्षकांना पदोन्नती लाभापासून आपात्र  केले आहे.
    सोमवारी 893 शिक्षकांचे ऑनलाईन द्वारे समूपदेशन घेण्यात येणार आहे. या पैकी 170 शिक्षकांना पदोन्नती आदेश देण्यात येणार असल्याची माहीती प्राथमिक शिक्षणधिकारी संजय जावीर यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना दिली.

    अंतिम सेवा ज्येष्ठता पदोन्नती
    893 शिक्षकांची यादी प्रकाशीत करण्यात आली आहे .मागील वर्षी काही शिक्षकानी पदोन्नती प्रक्रियेत सहभाग घेतला नव्हता त्यांचा नकार आल्याने 289 शिक्षकांना पदोंन्नतीचा लाभा 3 वर्षे त्यांना घेता येणार नाही.विस्तारधिकारी पदासाठी 6 जणांना पदोंन्नती देण्यात येणार आहे. तर मुख्याध्यापक पदासाठी 170 जणांना पदोन्नतीचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने जय्यत समुपदेशनाची तयारी केली आहे. सांगोला फॅबटेक इंजनिअरींग कॉलेज , अकलकोट पंचायात समिती ,पंढरपूर स्वेरी कॉलेज , माळशिरस पंचायात समिती , मंगळवेढा इंग्लिश स्कुल , माढा आदर्श पब्लीक स्कुल कुर्डवाडी ,करमाळा पंचायात समिती , मोहोळ पंचायात समिती , बार्शी सोनेक्स पोदार इंटरनॅशनल स्कूल , उत्तर अन दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिक्षकांच्या समुपदेशनासाठी स्थळ निश्चित करण्यात येत आहे. गटशिक्षणाधिकारी यांच्या समवेत तालुकानिहाय ऑनलाईन मुख्यालय स्तरावर समूपदेशन घेण्यात येणार आहे.या समुपदेशनासाठी सीईओ दिलीप स्वामी , डे.सीईओ इशाधीन शेळकंदे , प्रा.शि.अधिकारी संजय जावीर , समाजकल्याणधिकारी सुनिल खमितकर यांची उपस्थिती राहणार आहे.

    या बाबत थोडक्यात पार्श्वभूमी आशी की, जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नती निवड समितीचे अध्यक्ष इशाधीन शेळकंदे शिक्षक संघटनेचे प्रतिनीधी अंकूश काळे यांच्या शिष्टमंडळासह शिक्षणधिकारी संजय जावीर यांच्या बैठकीत पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यात आला.

    शिक्षक संघटनेचे प्रतिनीधी अंकुश काळे यांच्यासह शिष्टमंडळानी निवड समिती अध्यक्ष शेळकंदे यांची भेट घेतली. विस्तारधिकारी आणि मुख्याध्यपक पदोन्नतीला आमची कोणाची हारकत नाही. बहुतांशी शिक्षक हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत त्यापुर्वी त्यांची पदोन्नती करा आशी मागणी लावून धरण्यात आली. या मागणीवर साधक बाधक चर्चा करण्यात आली.सेवाज्येष्ठता यादीवरून प्रशासनाकडून समस्या मांडण्यात आल्या . सरतेशेवटी पात्र शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात याद्या प्रकाशीत करुन २८ आणि २९ मे रोजी समूपदेशन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू
    शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी शनिवार आणि रविवारी प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालय सुरू असणार आहे सेवा जेष्ठता यादी संकलन करण्यात येणार आहे. 29 मे रोजी समुपदेशन घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली