First won the trust then betrayed, defrauded businessmen of Rs 20 crore in Delhi

  पुणे : पुण्यातील एका हॉटेल मॅनेजरला दाम्पत्याने महसूल मंत्री ओळखीचे असून, महसूल विभागात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सहायक लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत २८ लाख ७८ हजार २०३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार

  या प्रकरणी सिद्धार्थ देविदास झेंडे (वय ३५) व सीमा सिद्धार्थ झेंडे (दोघेही रा. म्हसोबावाडी ता. इंदापूर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी समाधान रमेश सोनावणे (वय ३३, रा. महादेवनगर, उरळी कांचन, मूळ रा. कळमडू, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २६ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२४ च्या दरम्यान एअरपोर्ट रोडवरील मॅग्नेस स्वेअर बिझनेस हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.

  तक्रारदार बिझनेस हॉटेलमध्ये मॅनेजर

  पोलिसांच्या माहितीनुसार, समाधान सोनावणे हे उच्चशिक्षित असून त्यांचे एमबीए झाले आहे. ते मॅग्नेस स्वेअर बिझनेस हॉटेल मध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी सिमा झेंडे हे मॅग्नेस स्वेअर बिझनेस हॉटेलमध्ये उतरले होते. तेव्हा त्यांची समाधान सोनावणे यांच्याशी ओळख झाली. यावेळी सिद्धार्थ आणि सीमा झेंडे यांनी महसूल विभागात, मंत्रालयात, मंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगितले.

  सहायक लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष

  तसेच सोनावणे यांना महसूल विभागात सहाय्यक लिपिक पदावर नोकरी लावण्याच्या आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच, त्यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यात आणि रोख रक्कम अशी २८ लाख ७८ हजार २०३ रुपये घेतले. बदल्यात सहाय्यक लिपिक पदाचे जिल्हाधिकारी कार्यालय पुणेचे नियुक्तीपत्र दिले. पण, त्यांनी याची माहिती घेतल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रवींद्र ढावरे करत आहेत.