साताऱ्यात दोन दुचाकीच्या अपघातात 3 ठार, 2 जखमी

सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. या भीषण अपघातानं रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    सातारा : जिल्ह्यातील पाटण येथे नवारस्ता ढेबेवाडी मार्गावर सांगवर पुलाजवळ दोन दुचाकींमध्ये टक्कर होऊन अपघात झाला आहे.
    हा अपघात इतका भीषण होता की अपघात स्थळी अक्षरशः रक्ताचा सडाच पडलेला होता. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. या भीषण अपघातानं रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    पाटण तालुक्यातील येरफळे येथील बबन धोंडीराम पडवळ (वय 65) आणि त्यांचेच पुतणे भरत रामचंद्र पाटील (वय 40) आणि अन्य एक जण, असे तिघे सेंटरिंगच्या कामानिमित्त गेले होते. आपले काम संपवून मोटार सायकल वरून परत येत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला. सांगवड येथील पुलाजवळ समोरून नवारस्ता कडून भरघाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.