Tragic Accident in Buldhana

नागपूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मेहकर जवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि अल्टो कारची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यात तीन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत(3 killed and 3 seriously injured in a Tragic Accident in Buldhana). 

    बुलडाणा : नागपूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मेहकर जवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि अल्टो कारची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यात तीन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत(3 killed and 3 seriously injured in a Tragic Accident in Buldhana).

    जखमींना मेहकरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेली MH-40-BL-7061 क्रमांची ट्रॅव्हल्स बस आणि चाळिसगाववरुन डीग्रसला जाणारी अल्टो कार (MH-06-5134) यांच्यात  शनिवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराजवळ समोरासमोर धडक झाली.

    या अपघातात इंदल चव्हाण, योगेश विसपुते आणि विशाल विसपुते या तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर चव्हाण आणि मिथुन चव्हाण हे जखमी झाले आहे.

    मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा नंतर त्यांना औरंगाबाद येथे उपचार साठी हलविण्यात आले. अल्टो कार मधील 5 नातेवाईक डीग्रसला साखरपुडा समारंभासाठी जात असताना हा अपघात घडला.