मदतीच्या बहाण्याने ‘ते’ आले अन् रोकड लुटून फरार झाले…

घरी जात असताना एका व्यक्तीची दुचाकी स्लीप झाली. यातून सावरण्याचा प्रयत्नात असताना तीन आरोपी मदतीच्या बहाण्याने तेथे आले. मात्र, मदत करण्याचे सोडून त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण (Crime in Nagpur) केली आणि खिशातील 18 हजारांची रोकड हिसकावून फरार झाले.

    नागपूर : घरी जात असताना एका व्यक्तीची दुचाकी स्लीप झाली. यातून सावरण्याचा प्रयत्नात असताना तीन आरोपी मदतीच्या बहाण्याने तेथे आले. मात्र, मदत करण्याचे सोडून त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण (Crime in Nagpur) केली आणि खिशातील 18 हजारांची रोकड हिसकावून फरार झाले. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत घडली होती. या घटनेतील तिन्ही आरोपींना पकडण्यात नंदनवन पोलिसांना यश आले आहे.

    सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले आणि त्यांना बेड्या ठोकल्या. सिद्धार्थ अनिल पिल्लेवान (वय 22 रा. शास्त्रीनगर झोपडपट्टी), असलम खान फिरोज खान (वय 22, रा. हसनबाग) आणि नवाज खान रफीक खान (वय 22, रा. टिमकी चौकीजवळ, तहसील) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सचिन चंद्रभान चौधरी (वय 39, रा. चिटणीसनगर, उमरेड रोड) च्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

    गेल्या सोमवारी रात्री 2.30 वाजता ते चौक येथून घरी जात होते. रिजेंडा हॉटेलजवळ अचानक दुचाकी स्लीप झाल्याने ते खाली पडले. त्यांच्या हातापायाला दुखापत झाली. या दरम्यान वरील तिन्ही आरोपी तेथून जात होते. मदतीच्या बहाण्याने ते त्यांच्याजवळ आले. रस्ता सुनसान असल्याचे पाहून त्यांनी मदत करण्याचे सोडून सचिनला शिविगाळ करीत मारहाण सुरू केली. काय होत आहे हे समजण्यापूर्वीच आरोपींनी त्यांच्या खिशातील 18 हजार रुपयांची रोकड जबरीने हिसकावून घेतली आणि पसार झाले.

    सचिनच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यात आली. तांत्रिक तपासात या घटनेत सिद्धार्थ पिल्लेवानचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून सिद्धार्थला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने असलम व पोलिसांनी त्या दोघांनाही अटक वाजताच्या सुमारास सचिन हे केली. पुढील तपास सुरू आहे.