maratha-reservation

    बारामती : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तहसील कार्यालयांतर्गत कुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आजपर्यंत एकूण ३ हजार ४३९ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.
    या गावाच्या नोंदी तपासण्यात आल्या
    तालुक्यात २२ गावांच्या एकूण ९९ हजार ९७९ दप्तरांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव क.प., देऊळगाव रसाळ,  जळगाव सुपे, कांबळेश्वर, उंडवडी क.प. नारोळी  नेपवतळण, कोळोली आंबी खुर्द, मुरुम, वढाणे, वाकी, पणदरे, नीरा वागज, शिर्सुफळ, सोनवडी सुपे,  जोगवडी, कारखेल, मुर्टी, करंजे, शिरवली, अंजनगाव या गावाच्या नोंदी तपासण्यात आल्या आहेत.
    प्रशिक्षित व्यक्तींचे घेतले सहकार्य
    तालुका स्तरावर सन १९४८ पूर्वीची आणि १९४८ ते १९६७ या कालावधीतील नोंदी तपासण्यात येत आहेत. बहुतेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनालयाकडून प्रशिक्षित व्यक्तींचे सहकार्य घेण्यात आले आहे, अशीही माहिती श्री. नावडकर यांनी दिली आहे.