सासऱ्याचा अंत्यविधी उरकून परतताना ट्रकने चिरडले; तीन महिला ठार, 6 महिला जखमी

अंत्यविधी उरकून घराकडे परत येत असलेल्या गर्दीत घुसलेल्या एका ट्रकने महिलांना चिरडले. यामध्ये तीन महिलांचा मृत्यू (3 Women Killed) झाला तर अन्य सहा महिला जखमी झाल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur Accident) टाकळी (गुरसाळे) येथे ही दुर्दैवी घटना घडली.

    पंढरपूर : अंत्यविधी उरकून घराकडे परत येत असलेल्या गर्दीत घुसलेल्या एका ट्रकने महिलांना चिरडले. यामध्ये तीन महिलांचा मृत्यू (3 Women Killed) झाला तर अन्य सहा महिला जखमी झाल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur Accident) टाकळी (गुरसाळे) येथे ही दुर्दैवी घटना घडली. सासऱ्याचा अंत्यविधी करून लोक घराकडे परतत असताना या महिलांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    हिराबाई भारत गुटाळ (वय 35) आणि मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. तिसऱ्या मृत महिलेचे नाव समजू शकलेले नाही. घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने दु:खात असलेल्या टाकळी येथील गुटाळ कुटुंबाला हा फार मोठा धक्का बसला आहे. टाकळी (गुरसाळे) येथील गेनदेव गुटाळ यांचे शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. पाहुणे, नातेवाईक आल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गुरसाळे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    अंत्यसंस्कार करून परतताना अपघात 

    स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून परत घराकडे येत असताना एक ट्रक सरळ महिलांच्या घोळक्यात शिरला आणि या ट्रकने महिलांना चिरडले. मृत गेनदेव यांच्या त्या सुना होत्या. यामध्ये दोघी जागीच ठार झाल्या तर नंतर तिसऱ्या महिलेचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या महिलेचे नाव मात्र समजू शकले नाही. यावेळी अन्य सहा महिला देखील जखमी झाल्या आहेत. या घटनेने टाकळी, गुरसाळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.