3 year old adil who went missing died after drowning in a well in his own house

या घटनेची माहिती ब्राम्हणवाडा थडीचे ठाणेदार पंकज दाभाडे यांना दिली. त्यानंतर आदिल इनामदार बेपत्ता झाल्याची नोंद (Reported missing) करून मुलाचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांकासह फोटोसह संदेश सोशल मिडियावर (social media) पाठवून तपास सुरू केला. आदिलचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर दोन जणांना घराच्या अंगणात असलेल्या विहिरीत उतरविण्यात आले, तेथे आदिल इनामदारचा मृतदेह दिसला.

    चांदूरबाजार : ब्राम्हणवाडा थडी (Brahmanwada Thadi) येथील एका ३ वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू (Death by falling in well) झाला. ही घटना बुधवार, ३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. आदिल जिशान इनामदार (Adil Jishan Inamdar) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    खेळता – खेळता पडल्याची शक्यता

    मिळालेल्या माहितीनुसार, ब्राम्हणवाडा थडी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबूभाई इनामदार यांचा नातू व जिशान इनामदार यांचा मुलगा आदिल इनामदार हा सकाळी ११ वाजता नर्सरी शाळेतून घरी परतला. त्यानंतर तो खेळायला गेला. दुपारी १ वाजतापासून तो अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती ब्राम्हणवाडा थडीचे ठाणेदार पंकज दाभाडे यांना माहिती दिली. त्यानंतर आदिल इनामदार बेपत्ता झाल्याची नोंद (Reported missing) करून मुलाचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांकासह फोटोसह संदेश सोशल मिडियावर (social media) पाठवून तपास सुरू केला.

    दरम्यान कुटुंबीयांनी गावातील नातेवाईकांकडे विचारपूस सुरू केली. मात्र, आदिलचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर दोन जणांना घराच्या अंगणात असलेल्या विहिरीत उतरविण्यात आले, त्यानंतर आदिल इनामदारचा मृतदेह दिसला. त्यांनी आदि तात्काळ बाहेर काढून  डॉक्टरांकडे नेले. परंतु, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली होती. आदिलच्या मृत्यूमुळे नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरु झाला. संपूर्ण इनामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले असून गावातील सर्वांचे डोळे पाणावले आहेत.