Online fraud committed in the name of Fasttrack Renewal, Rs 1 Lakh

बीडमध्ये (Beed Crime) एका व्यक्तीची ३० लाखांची फसवणूक (30 Lakh Fraud) करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    बीड : कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या शोच्या नावाने बीडमध्ये (Beed Crime) एका व्यक्तीची ३० लाखांची फसवणूक (30 Lakh Fraud) करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीड सायबर सेलने बिहारमधून दोघा जणांना अटक केली आहे.

    बीडमधील एका व्यक्तीला ९८ लाख रुपये किमतीची कार लॉटरीत लागल्याचे सांगून त्याच्याकडून तब्बल २९ लाख २३ हजार रुपये उकळण्यात आले होते. या व्यक्तीने तक्रार केल्यानंतर याचा तपास बीडच्या सायबर सेलने केला आहे. गुजरातच्या व्यापाऱ्याकडून हे पैसे थेट पाकिस्तानात पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. हा पैसा देशविघातक कामासाठी वापरण्यात येतो का याचा तपास बीड पोलीस करीत आहेत. भारतातून आतापर्यंत १८ कोटी रुपये पाकिस्तानमधल्या व्यक्तीच्या खात्यावर गेले असल्याची माहिती समोर आली आहे.