झेडपीतील ३० शिपाई झाले कनिष्ठ सहाय्यक! रखडलेल्या पदोन्नतीला मिळाली मंजुरी

सोलापूर जिल्हा परिषदेने ३० परिचरांना कनिष्ठ सहाय्यक म्हणून पदोन्नती दिल्याने कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने विविध विभागात कार्यरत असलेल्या शिपायांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.

  सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेने ३० परिचरांना कनिष्ठ सहाय्यक म्हणून पदोन्नती दिल्याने कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने विविध विभागात कार्यरत असलेल्या शिपायांनाही पदोन्नती देण्यात आली आहे.

  यामध्ये जयश्री माने, रामचंद्र देवकते, प्रमोद जगताप, सुनंदा माने, दत्तात्रय कारंडे, संतोष माळी, आनंद टेके, राजू गाडपल्ली, हुसेन शेख, मंजुषा घोडके, कमलेश खाडे, अनुराधा अंजूटगी, नितीन असबे, प्रभावती पवार, अमिना मुजावर, सागर होनमाने,नंदा चव्हाण, रुस्तुम नदाफ, श्रीदेवी महामुरे, राजपाल रणदिवे, सविता माळी, सुलभा पालके, विजया अदलिंगे, धनंजय बोराडे, श्रीकांत माळी, दमयंती निमगिरे, रंजना केकडे, नागनाथ होनकळस, नारायण खांडेकर, कैलास जिदे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

  -कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
  झेडपीतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती गेल्या बऱ्याच वर्षापासून रखडल्या होत्या. याबाबत मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. सीईओ स्वामी यांनी या मागण्यांची दखल घेत पदोन्नतीला मंजुरी दिली. तसेच प्रशासन विभागाने नुकतीच या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  -अनुकंपावरील भरतीबाबत उलट सुलट चर्चा
  दरम्यान, शुक्रवारी जिल्हा परिषदेत अनुकंपाच्या प्रतीक्षा यादीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. यातील बऱ्याच जणांकडून कागदपत्रांची जमवाजमव करून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने अनुकंपावरील भरती कधी काढली याबाबत आता जिल्हा परिषदेत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.