हिंजवडीत ३१ किलो गांजा जप्त, दोघाना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे. १४ लाख ३८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

    पिंपरी : हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे. १४ लाख ३८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. मैनुद्दीन अब्दुल सत्तार (२३) आणि बिपलभ बिधन राणा (२४, दोघे रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

    अवैध धंद्याची माहिती घेत हिंजवडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. आरोपी टेम्पोतून गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाकड येथे टेम्पो अडविला. आरोपींकडे थांबवून चौकशी केली असता भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना संशय आला.

    टेम्पोतील पिशव्यांची झडती घेतली. त्यात ब्राऊन रंगाचे १७ पुडे आढळले. त्यामध्ये ३१ किलो १०० ग्रॅम गांजा मिळून आला. गांजा आणि टेम्पोसह १४ लाख ३८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.