31 lakh Rs Goat In Sangli

सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील माडग्याळ जातीचा आणि रागू चोचीचा एक बकरा तब्बल 31 लाखाचा आहे. आटपाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या राजा नावाच्या बकराचा सत्कार केला आहे. या बकऱ्या बरोबर फोटो काढण्या साठी ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी गर्दी केली होती( 31 lakh Rs Goat In Sangli ).

    माडग्याळ जातीचा बकरी आणि बकरा हे जगप्रसिद्ध आहेत. या बकरीला लाखो रुपयांची किंमत येत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी रागू सारखी चोच असणारा हा बकरा अतिशय देखणा सुंदर दिसतो. या बकर्यांला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

    आटपाडी मधील विलास पाटील यांचा माडग्याळ जातीचा राजा नावाचा बकरा आहे, त्याचा संभाळ हा अप्पा खरात यांनी केला आहे. राजा बकरा अवघ्या 2 महिने 8 दिवसाचा असून त्याला तब्बल 31 लाखाची मागणी आहे तर याच्या आज्जीला तब्बल दीड कोटीला मागितला असल्याचे मालकाने सांगितले.