महावितरण अभियंत्याच्या घरी 33 लाखांची चोरी; 10 दिवसांत तब्बल 8 घरं फोडली

सोनेगाव ठाण्यांतर्गत चोरांचा सुळसुळाट कायम आहे. सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशतीचे (Nagpur Crime) वातावरण आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये घरफोडीच्या 8 घटनांमध्ये चोरांनी 70 ते 80 लाख रुपयांच्या मालावर डल्ला मारला. या घटनांनी सोनेगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

    नागपूर : सोनेगाव ठाण्यांतर्गत चोरांचा सुळसुळाट कायम आहे. सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशतीचे (Nagpur Crime) वातावरण आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये घरफोडीच्या 8 घटनांमध्ये चोरांनी 70 ते 80 लाख रुपयांच्या मालावर डल्ला मारला आहे. या घटनांनी सोनेगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

    एक दिवसापूर्वीच बांते लेआऊटमध्ये चोरांनी एका व्यापाऱ्याचे घरफोडून 15 लाख रुपयांच्या मालावर हातसाफ केला होता. या घटनेचा तपास सुरू असतानाच आणखी दोन घटना पुढे आल्या आहेत. चोरांनी महावितरण कंपनीचा अभियंता आणि आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेच्या घरून एकूण 41 लाख रुपयांचा माल चोरून नेला. पहिली घटना दुपारे लेआऊटच्या रचना मधुकोश अपार्टमेंटमध्ये घडल्याचे समोर आले. फिर्यादी अमित अनंत शिवरकर (47) हे महावितरण कंपनीत कार्यकारी अभियंता आहेत.

    सध्या त्यांची नियुक्ती मुंबईत आहे. गेल्या 16 नोव्हेंबरला अमित हे पत्नी आणि मुलासह मुंबईला गेले. मुलगी आनंदीही आजोबांच्या घरी गेली होती. शनिवारी दुपारी तिला काही वस्तूंची आवश्यकता होती. घरी येऊन त्या वस्तू घेतल्या आणि परत आजोबांकडे गेली. या दरम्यान अज्ञात आरोपीने घराचे कुलूप तोडून अमित यांच्या घरात प्रवेश केला. बेडरुमच्या कपाटातून सोन्याचे बिस्किट आणि दागिने असे एकूण 360 ग्रॅम सोने, रोख 10 लाख रुपयांसह 33 लाखांच्या मालावर हातसाफ केला.