३३ वर्षीय तरुणाला नग्न करून लावले नाचायला, येरवडा परिसरातील घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील येरवडा परिसरात एका ३३ वर्षीय तरुणाला तुझा भाऊ भेटण्यासाठी आला असल्याचे सांगत रूमवर नेहून नग्न होण्यास भाग पाडत नाचण्यास लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

    पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात एका ३३ वर्षीय तरुणाला तुझा भाऊ भेटण्यासाठी आला असल्याचे सांगत रूमवर नेहून नग्न होण्यास भाग पाडत नाचण्यास लावल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा नग्न व्हिडीओ सोशल मिडीयावर देखील व्हायरल करत त्याची बदनामी केली आहे.

    याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा नोंद केला असून, येरवडा परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार व सुभाष हनुमंतराव भोसले (रा. सर्व रा. एकता हौसिंग सोसायटी, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात ३३ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी हे प्रवरानगर येथील तिसगाव येथील आहेत. तक्रारदार तरूण पुण्यात नोकरी करतो. तर, आरोपी सोमनाथ व चंद्रकांत हे तक्रारदार यांच्या गावातील आहेत. दरम्यान, दोघांनी तक्रारदार यांना तुझा भाऊ रूमवर आला आहे, असे सांगून त्यांच्या फ्लॅटवर नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर त्याला नग्न करत नाचायला लावले. तो नाचत असतानाचे व्हिडीओ देखील काढले. त्यानंतर हे व्हिडीओ आरोपींनी प्रवरानगर येथील व्हॉट्सअ पग्रुपवर व्हायरल करत त्याची बदनामी केली. त्यासोबतच आरोपींनी त्याच्याकडील ६० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपी पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.