डोंबिवली शहरातील २७ रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ३३५ कोटींचा निधी मंजूर

पुढे बोलताना काम सुरू असताना नागरिकांना वाहतूक कोंडी सारख्या समस्यांना सामोरे जावं लागेल. यासाठी आधीच दिलगिरी व्यक्त करतो.

    कल्याण : डोंबिवली शहरातील २७ रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणासाठी सरकारकडून ३३५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात या रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचं काम सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी हे कामे पुढील दोन वर्षात पूर्ण होणार असून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. चांगल्या दर्जाचे रस्ते मिळतील असं आश्वासन दिलं. पुढे बोलताना काम सुरू असताना नागरिकांना वाहतूक कोंडी सारख्या समस्यांना सामोरे जावं लागेल. यासाठी आधीच दिलगिरी व्यक्त करतो. मात्र रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण होणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असे आवाहन देखील मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केले.

    यावेळी माहिती देताना रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली व ठाण्याला जोडणारा माणकोली पुलाचे काम देखील पूर्णत्वाकडे आले असून दुसऱ्या बाजूच्या मुलाचा दुसऱ्या बाजूस असलेल्या जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच हा पूल देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे सांगितले.