अबब…कृष्णेत सापडला तब्बल ३५ किलोंचा मासा; मासा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

एक-दोन किलोचे वाम, मरळ मासे म्हणजे कृष्णा नदीतील मासेमारांची चैन पाच-सात किलोचा मासा सापडला तरी जल्लोष करावा, अशी स्थिती. अशावेळी दह्यारी (ता. पलूस) दोन मासेमारांना तब्बल ३५ किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला आहे.

    पलूस / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : एक-दोन किलोचे वाम, मरळ मासे म्हणजे कृष्णा नदीतील मासेमारांची चैन पाच-सात किलोचा मासा सापडला तरी जल्लोष करावा, अशी स्थिती. अशावेळी दह्यारी (ता. पलूस) दोन मासेमारांना तब्बल ३५ किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला आहे. मासेमारीच्या आनंदाला उधाण आले. नदीत एवढा मोठा मासा आढळणून येण्याची पहिली घटना आहे. एवढा मासा सापडणे तसे दुर्मिळ आहे.

    मच्छीमार अनिल देवळकर व रवींद्र मदने यांना कृष्णा नदी पात्रात मासेमारी करताना कटला जातीचा मासा‌ सापडला. देवळकर मदने व लहानपणापासून नदीपात्रात मासेमारी करतात. कृष्णा नदी पात्रात माशांच्या अनेक जाती आहेत. शुक्रवारी पहाटे त्यांच्या गळाला हा मोठा मासा लागला आणि त्यांना विश्वासच बसेना. हा मासा इतका मोठा होता की या दोघांना नदीपात्रातून काढणे मुश्कील झाले. मासा बाहेर काढल्यानंतर परिसरातून बघ्यांची गर्दी झाली. नदीपात्रात अनेक जातींच्या माशांसह इतरही जलचर प्राणी असल्याने पाणी शुद्ध राहण्यास मदत होत असते.

    नदीपात्रात कारखान्यांची मळी रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने या जलचर प्राण्यांच्या जाती नष्ट होत आहेत. अशावेळी एवढा मोठा मासा सापडणे आमच्यासाठी आश्चर्यच आहे.

    रवींद्र मदने, मासेमारी