घरातील ३६ लाखांच्या दागिन्यांवर चोराचा डल्ला ; बारामती तालुक्यातील घटना

 बारामती तालुक्यातील पणदरे-ढाकाळे या मुख्य रस्त्यालगत दावण मालिक पीर दर्गा समोर असणाऱ्या कोकरेवस्ती (सोनकस वाडी) या परिसरात सोमवार (दि.८) सकाळी ६ ते ७ या दरम्यान ३६ लाख रुपयांच्या सोन्याची जबरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

    माळेगाव: बारामती तालुक्यातील पणदरे-ढाकाळे या मुख्य रस्त्यालगत दावण मालिक पीर दर्गा समोर असणाऱ्या कोकरेवस्ती (सोनकस वाडी) या परिसरात सोमवार (दि.८) सकाळी ६ ते ७ या दरम्यान ३६ लाख रुपयांच्या सोन्याची जबरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

    फिर्यादी हनुमंत आनंद कोकरे (वय ६८ वर्ष, रा. सोनकसवाडी) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या जबरी चोरीमुळे पणदरे व ढाकाळे या परिसरात भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे.दरम्यान आमचे राहते घर ‘कलानंद’ बंगला सोनकसवाडी( कोकरेवस्ती ) येथे कोणत्यातरी अज्ञात इसमाने आमचे राहते घराचे मुख्य दरवाज्याची बाहेरुन लावलेली कडी काढूली ,त्यावाटे आत प्रवेश करुन आतील बेडरूमच्या दरवाजाची बाहेरुन लावलेली कढी उघडुन आत प्रवेश केला .कपाटात ठेवलेले ६८० ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम १लाख ५०,००० रुपये चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली, अशी महिती सहाय्यक फौजदार शशिकांत वाघ यांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास साळवे करत आहेत.