३६ वर्षीय व्यक्तीमुळे फोर्टिस हॉस्पिटल कल्‍याणमध्‍ये २०२२ चे पहिले कॅडव्‍हेरिक दान झाले शक्‍य

त्या मृत व्‍यक्‍तीचे हृदय, यकृत व मूत्रपिंड यशस्वीरित्या रिट्राइव्‍ह करण्यात आले आणि शहरातील हॉस्पिटल्‍समधील प्राप्तकर्त्यांमध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी पाठवण्यात आले. फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण येथील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पाटील आणि कन्‍सल्‍टण्‍ट इंटरव्हेंशन न्यूरोलॉजिस्ट डॉ. राकेश लल्ला यांनी रूग्ण व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

  • हे मुंबईमधील वर्षातील ४०वे कॅडव्‍हेरिक दान आहे
  • ३६ वर्षीय व्यक्तीच्‍या कुटुंबाकडून अवयव दानाला संमती; हृदय, मूत्रपिंड, यकृत रिट्राइव्‍ह करून प्रत्‍यारोपणासाठी पाठवण्‍यात आले

कल्‍याण : ठाणे (Thane) येथील एका ३६ वर्षीय व्यक्तीचा रस्त्यावर अपघात (Road Accident) होऊन त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत (Severe Head Injury) झाली होती आणि त्यानंतर त्याला ब्रेन डेड (Brain Dead) घोषित करण्यात आले.

शनिवारी कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केल्‍यानंतर त्याची आई आणि भावाने त्याचे अवयव दान (Organ Donate) करण्यास संमती दिली. या अवयव दानामुळे यावर्षी फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण (Fortis Hospital, Kalyan) येथे पहिले कॅडव्‍हेरिक दान आणि रिट्राइव्‍ह (First Cadaveric Donation And Retrieval) शक्‍य झाले.

रुग्णाच्या कुटुंबियांना अवयव दानाबद्दल, तसेच त्‍यामुळे अवयवदानासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या लोकांचे जीवन कसे वाचवण्यास मदत होते याबाबत माहित होते. त्यांनी दानासाठी संमती दिल्यानंतर झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (झेटीसीसी) ने अवयवांचे वाटप केले.

त्या मृत व्‍यक्‍तीचे हृदय, यकृत व मूत्रपिंड यशस्वीरित्या रिट्राइव्‍ह करण्यात आले आणि शहरातील हॉस्पिटल्‍समधील प्राप्तकर्त्यांमध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी पाठवण्यात आले. फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण येथील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पाटील आणि कन्‍सल्‍टण्‍ट इंटरव्हेंशन न्यूरोलॉजिस्ट डॉ. राकेश लल्ला यांनी रूग्ण व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

कॅडव्‍हेरिक अवयव दानाबाबत सांगताना फोर्टिस हॉस्पिटल, कल्‍याणच्‍या फॅसिलिटी डायरेक्‍टर डॉ. सुप्रिया अमेय म्‍हणाल्‍या, “प्राप्‍तकर्ता कुटुंबांप्रमाणेच, आम्ही शोकग्रस्त कुटुंबाचे आभारी आहोत, ज्यांनी त्यांच्या दु:खाच्‍या काळात देखील समाजाला सहकार्य करण्‍याचा विचार केला. कोविड-१९ मुळे तात्पुरत्या थांबलेल्‍या अवयव दानाबद्दल पुन्हा एकदा जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. अवयव दानामुळे प्रगतीशील परिवर्तनाच्‍या दिशेने वाटचाल करण्‍यास गती मिळते.’’

रुग्णाच्या पश्चात त्याची सात वर्षांची मुलगी, पत्नी, आई-वडील, लहान भाऊ व मोठी बहीण असा परिवार आहे.