Manegro Narendra Sopal Memorial Tennis Tournament
Manegro Narendra Sopal Memorial Tennis Tournament

  पुणे : एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सून लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत अभिषेक बोधे याच्या ८० धावांच्या जोरावर एलके इलेव्हन संघाने फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा ६३ धावांनी सहज पराभव करून विजेतेपद संपादन केले.

  पहिल्यांदा फलंदाजी करताना २०३ धावांचा डोंगर
  मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एलके इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०३ धावांचा डोंगर उभा केला. अभिषेक बोधे याने ४८ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह ८० धावा फटकावल्या. गिरीष कोंडे याने ३९ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ६४ धावांची खेळी साकारली व संघाला विशाल धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानासमोर फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा डाव १४० धावांवर मर्यादित राहीला.
  स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक
  स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आदित्य पाळंदे, अमित उमरीकर, गिरीष ओक आणि शंतनु आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान जगदीश सुर्वे, सर्वोत्कृष्ट फलंदाज गिरीष कोंडे, सर्वोत्कृष्ट गोलंदाजचा मान सईश शिंदे यांना मिळाला.

  सामन्याचा संक्षिप्त निकाल : अंतिम सामना : 
  एलके इलेव्हनः २० षटकात ६ गडी बाद २०३ धावा (अभिषेक बोधे ८० (४८, ९ चौकार, १ षटकार), गिरीष कोंडे ६४ (३९, ७ चौकार, २ षटकार), अर्थव तांदळे २-१४, सचिन कापडे २-२९) वि.वि. फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबः १५.२ षटकात ९ गडी बाद १४० धावा (शैलेश देशपांडे ३५, किरण मेने २२, सागर वाघमारे २१, अमित गणपुले ३-१५, अभिजीत कुलकर्णी ३-२९); सामनावीरः अभिषेक बोधे;

  स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके :
  सर्वोत्कृष्ट खेळाडू : जगदीश सुर्वे (डिझायनर इलेव्हन, ३२७ धावा, ९ विकेट);
  सर्वोत्कृष्ट फलंदाजः गिरीष कोंडे (एलके इलेव्हन, ३२९ धावा);
  सर्वोत्कृष्ट गोलंदाजः सईश शिंदे (ग्लोबल वॉरीयर्स, १५ विकेट)