4 acb with the headmaster demanded bribe for admission to class XI

एका पालकाने आपल्या मुलाला अंशतः अनुदानित यादीनुसार भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश मिळण्यासाठी मुख्याध्यापकासह तीन खाजगी कर्मचार्‍यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.

    बुलढाणा : मुलाला अंशतः अनुदानित यादीनुसार भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात (India Secondary and higher secondary school) इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश (Admission to Science) देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या मुख्याध्यापक व ३ खाजगी कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून, ३ ऑगस्टला ही कारवाई करण्यात आली.

    मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडू गायकवाड (Principal Prahlad Dhondu Gaikwad),( रा.महाराणा प्रताप नगर, सुंदरखेड) खाजगी कर्मचारी वस्तीगृह कार्यवाहक गजानन सुखदेव मोरे (रा. बिरसिंगपूर), मजूर जितेंद्र प्रल्हाद हिवाळे (रा. नांद्राकोळी) आणि खाजगी लेखापाल राहुल विष्णू जाधव (रा. देऊळघाट) अशी आरोपींची नावे आहेत. अलीकडे प्रशासकीय कार्यालयात म्हणा की खाजगी क्षेत्रात वेळेवर काम करून देण्यासाठी काही लाचखोरांना  ‘लक्ष्मीभेट’ स्विकारण्याची सवय अंगवळणी पडल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

    येथील एका पालकाने आपल्या मुलाला अंशतः अनुदानित यादीनुसार भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश मिळण्यासाठी मुख्याध्यापकासह तीन खाजगी कर्मचार्‍यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती १० हजार रुपये घेण्या देण्याचे ठरले. दरम्यान ३ ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने भारत विद्यालयाच्या बाजूच्या मोकळ्या जागेत सापळा रचला. यावेळी मुख्याध्यापक गायकवाड यांच्या सांगण्यावरून १० हजाराची लाच स्विकारण्यात येताच पथकाने सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

    सदर कारवाई येथील पोलीस उप अधीक्षक एस. एन. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सचिन इंगळे, स. पो. उपनि. भांगे, पोहेकाॅ. विलास साखरे, राजु क्षिरसागर, पो.ना. मो.रिजवान, विनोद लोखंडे, जगदीश पवार, पो.शि.अ.काझी, स्वाती वाणी या एसीबी पथकाने केली.