4 crore 93 lakh laptops seized along with trucks Wadner police arrested two accused from Haryana

आर. जे. ०९ जी.डी. २०२३ या गाडीमध्ये ब्लू डार्ट कंपनीच्या चैन्नई येथील वेअर हाऊसमधून ३८२४ लीनोओ कंपनीचे लॅपटॉप किमत १४ कोटी ६१ लाख ३८ हजार ४९७ रूपयांचा मुद्देमाल लोड करून संवेक्स टेक्नॉलॉजी गुडगाव येथे पोहचविण्याकरीता आरोपी ट्रकचालक मोमीन खान व रॉबीन नबाब खान यांच्या स्वाधीन ३८२४ लॅपटॉप केले होते. आरोपींनी संगनमत करून ३८२४ लॅपटॉप पैकी १४१८ लॅपटॉपचा अपहार केला.

  येरला : दारोडा टोलनाका परिसरातून ट्रकमधून लंपास केलेल्या लॅपटॉप पैकी १२९८ लॅपटॉपसह ट्रक (किंमत ४ कोटी ९३ लाख ४४ हजार) हरियाणा मेवात येथून केले जप्त केले. वडनेर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांकावरील दारोडा टोलनाका परिसरातून ट्रकचालकांनी ट्रकमधील ३८२४ लॅपटॉपपैकी १४१८ लॅपटॉप लंपास केल्याची तक्रार कंपनीचे सुपरवायजर अशफाक मुस्तफा खान नागपूर यांनी वडनेर पोलीस ठाण्यात केली होती.

  पोलिसांनी लॅपटॉप लंपास करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करुन ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अभिषेक अबागडे, पोलिस कर्मचारी अमित नाईक, आशीष डफ, रंजीत फाले यांनी चोरट्यांचा शोध घेऊन हरीयाणा राज्यातील मेवात येथून ४ कोटी ९३ लाख ४४ हजार ७६८ किंमतीचे १२९८ लॅपटॉपह आर.जे. १४ जी. के. ५१३२  क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेतल्याची माहिती सोमवार ३० मे रोजी पोलिसांनी दिली.

  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर. जे. ०९ जी.डी. २०२३ या गाडीमध्ये ब्लू डार्ट कंपनीच्या चैन्नई येथील वेअर हाऊसमधून ३८२४ लीनोओ कंपनीचे लॅपटॉप (किमत १४ कोटी ६१ लाख ३८ हजार ४९७ रूपयांचा मुद्देमाल लोड करून संवेक्स टेक्नॉलॉजी गुडगाव येथे पोहचविण्याकरीता आरोपी ट्रकचालक मोमीन खान व रॉबीन नबाब खान दोन्ही (रा. गुडगाव मेवात हरियाणा) यांच्या स्वाधीन ३८२४ लॅपटॉप केले होते. आरोपींनी संगनमत करून ३८२४ लॅपटॉप पैकी १४१८ लॅपटॉपचा अपहार केला.

  आरोपींनी अपहार केलेले लिने कंपनीचे लॅपटॉप रायपुरी थाना- नुह जिनुह मेवात हरियाणा येथे आरोपीकडे आहेत. त्यावरून सदर ठिकाणचे स्थानिक पोलीस सीआयएटीम नुह मेवात हरियाणा यांनी सदर गुन्हयातील अपहार झालेले १४१८ लिनोजी कंपनीच्या लैपटॉपपैकी १२८६ लैपटॉप ट्रक जार. जे. १४ जी. के. ५१३२ ताब्यात घेतले. त्यावरून सीआय एटिम यांनी पोलीस स्टेशनसह येथे लेखी रिपोर्ट देवून गुन्हा नोंद केला. वडनेर पोलिसांनी मेवात हरियाणा येथे जाऊन १२९८ लॅपटॉप (कि. ४ कोटी ९३ लाख ४४ हजार ७६८ रुपये) ताब्यात घेऊन वडनेर पोलीस ठाण्यात आणले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अभिषेक बागडे, पोलीस कर्मचारी अमित नाईक, आशीष डफ, रंजीत फाले यांनी केली.  पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहेत.

  आरोपीवर एटीएम मिशन चोरीचे गुन्हे नोंद

  यातील आरोपी शाहिद उर्फ सुज्जा सुजाउद्दीन खान मेवात हरियाणा याच्यावर ब-याच राज्यात एटीएम मशिन चोरीच्या गुन्ह्याची नोंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.