4 crore 95 lakhs sanctioned for water supply under Pradhan Mantri Jal Jeevan Mission Yojana

अनेक वर्षांपासूनपासून प्रतिक्षेत असलेली पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर सुरू होणार आहे. योजनेला शासनस्तरावर मंजुरात मिळाली असून आता मुंगळा येथील ग्रामस्थांची कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली निघणार आहे, अशी माहिती सरपंच शुभांगी प्रविण वायकर (Sarpanch Shubhangi Waikar) यांनी दिली आहे.

    मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. मुंगळा( Mungala ) हे गाव तालुक्यात लोकसंख्याच्या दृष्टीने मोठी ग्रामपंचायत आहे. मुंगळा या गावाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून येथे शासनाच्या वतीने अनेक योजना मंजूर झाल्या. मात्र, येथील राजकीय पुढाऱ्यांनी श्रेय लाटूपणामुळे व स्वार्थ साधू धोरणामुळे येथे मंजूर झालेले योजनेचे काम सुरु होता होता राहून गेले.

    गावातील ही समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून प्रधानमंत्री जल जीवन मिशन( Pradhan Mantri Jal Jeevan Mission) योजने अंतर्गत ४ कोटी ९५ लक्ष रुपये मंजूर करुन घेतले. गावामध्ये बऱ्याच दिवसांपासून पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर होती. मात्र, आता ही समस्या कायमची सुटणार असून गावातील नागरिकांना पिण्याकरिता आता शुद्ध पाणी मिळणार आहे.

    उर्ध्व मोर्णा प्रकल्पामधून (Urdhwa Morna Project) ५ किलोमीटर पाईपलाईनच्या साह्याने पाणी गावामध्ये आणून फिल्टर करून सर्वसामान्य जनतेला वितरण व्यवस्थेमार्फत प्रत्येक घराघरापर्यंत पाणी या योजनेमधून पुरवठा होणार आहे. गावामध्ये १० किलोमीटर पाईपलाईनचे जाळे तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये १ लक्ष ८१ हजार लीटर क्षमतेचे टाकीचे बांधकाम सुद्धा करण्यात येणार आहे. सुसज्ज फिल्टर प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे.