बस अन् कंटेनरच्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू, एका पोलिसांचा समावेश; 20 हून अधिक जण जखमी

पुणे- सोलापूर (Pune-Solapur)राष्ट्रीय महामार्गावर दौंड (Dound)तालुक्यातील वाखारी चौफुला हद्दीत बुधवारी (दि.1) पहाटे सीएनजी पेट्रोल पंपाजवळ खासगी लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  पाटस : पुणे- सोलापूर (Pune-Solapur)राष्ट्रीय महामार्गावर दौंड (Dound)तालुक्यातील वाखारी चौफुला हद्दीत बुधवारी (दि.1) पहाटे सीएनजी पेट्रोल पंपाजवळ खासगी लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 हून अधिक प्रवाशी गंभीर जखमी आहेत.

  गणपत पाटील, नितीन दिलीप शिंदे, आरती बिराजदार व अमर माननेश कलशेट्टी असे या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. दरम्यान, या अपघात मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

  4 प्रवाशांचा मृत्यू

  पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघली होती. तर टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर ही बस आदळून अपघात झाला. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली. या अपघातातील जखमींना नजिकच्या केडगाव येथील दवाखान्यात तर काही गंभीर जखमींना पुण्याला हलविण्यात आले आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी दोन प्रवाशांनी हे जग सोडले.

  पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

  मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये २ पोलिसांचा समावेश या चार मृतांमध्ये एक पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीचाही यात मृत्यू झाला आहे. यामुळे तीन पोलिस कर्मचाऱ्यांची कुटुंबे या अपघातात उध्वस्त झाली आहेत.