उत्तर प्रदेशमधील भीषण अपघातात बारामतीतील चौघे ठार

उत्तर प्रदेशमधील नोएडानजीक यमुना एक्स्प्रेसवेवर बोलेरो व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बारामती शहरातील चार जणांचा समावेश आहे.

  बारामती / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : उत्तर प्रदेशमधील नोएडानजीक यमुना एक्स्प्रेसवेवर बोलेरो व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बारामती शहरातील चार जणांचा समावेश आहे.

  चंद्रकांत नारायण बोराडे (वय ६८), सुवर्णा नारायण बोराडे (वय ५९),रंजना भरत पवार (वय वय ६०), मालन विश्वनाथ कुंभार (वय ६८, चौघे रा. बारामती) आणि नुवजन मुजावर, रा कर्नाटक) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातातील गाडीचा चालक व आणखी एक महिला गंभीर जखमी आहे.

  चारधाम यात्रेसाठी एकूण पन्नास लोक महाराष्ट्रातून निघाले होते. बुधवारी (दि११) रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. पहिला नजीक जेवर गावाजवळ जेवर गावाजवळ डंपरला जोरदार धडक दिली. अपघातात पाच जण गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  दरम्यान, या अपघाताची माहिती बारामती परिसरात समजताच शहरात शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठ पातळीवरून अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले.

  खासदार सुळेंची योगींना मदतीची विनंती

  खासदार सुप्रिया सुळे यांना या अपघाताची माहिती मिळताच, त्यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क करून मयताच्या नातेवाईकांना योग्य ती मदत करण्याची विनंती केली. तुम्ही केलेल्या विनंतीमुळे उत्तर प्रदेशमधील पोलीस यंत्रणेने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात लवकर देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.