पढंरपुरात चार मजुरांना रेल्वेनं उडवलं, तिघांचा मृत्यू

पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. रुळाजवळ असलेल्या चार मजुरांना रेल्वेने धडक दिल्यान हा अपघात झाला.

    सोलापूर : ४ मजुरांना रेल्वेने धडक दिल्याची घटना पंढरपूरमध्ये (Pandharpur Accident) उघकीस आली आहे. या अपघातात तीनं जणांचा मृत्यू झाला असून एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हे चारह जण मूळचे बिहारचे असल्याची माहिती समोर. आली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.

    पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. रुळाजवळ असलेल्या चार मजुरांना रेल्वेने धडक दिल्यान हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांना रुग्णलयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान एकाची प्राणज्योत मालावली. तर, चौथ्या मजुरावर उपचार करण्यात येत आहे. अपघातातील मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप मृत अथवा जखमींची ओळख पटलेली नाही.

    रुळाजवळ सापडल्या दारुच्या बाटल्या

    दरम्यान रुळाजवळ दारुच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत. त्यामुळे या मजूर दारु प्यायले असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.