
तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलात ऑगस्ट अखेर १९१ मिलीमीटर, तासगाव मंडलात १३९ मिलीमीटर, सावळज मंडलात १२३ मिलीमीटर, मांजर्डे मंडलामध्ये ११४ मिलीमीटर, येळावी मंडलात ९३ मिलीमीटर आणि मणेराजुरी मंडलामध्ये ९१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टअखेरीस सरासरी १२५ मिलीमीटर पाऊस पडला.
तासगाव : तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलात ऑगस्ट अखेर १९१ मिलीमीटर, तासगाव मंडलात १३९ मिलीमीटर, सावळज मंडलात १२३ मिलीमीटर, मांजर्डे मंडलामध्ये ११४ मिलीमीटर, येळावी मंडलात ९३ मिलीमीटर आणि मणेराजुरी मंडलामध्ये ९१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टअखेरीस सरासरी १२५ मिलीमीटर पाऊस पडला. हा पाऊस ऑगस्टअखेरच्या सरासरी पावसाच्या ४० टक्के एवढा टक्के आहे.
कृषि विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात दरवर्षी सरासरी ५४० मिलीमीटर पाऊस पडतो. यापैकी जून महिन्यात ११४ मिलीमीटर, जुलै महिन्यात १०६ मिलीमीटर, ऑगस्ट महिन्यात ८६ मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्यात १३३ मिलीमीटर आणि ऑक्टोंबर महिन्यात १०१ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदाच्या पावसाळ्यात जूनच्या अखेर तालुक्यात केवळ २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विसापूर मंडलात सर्वाधिक ८१ मिलिमीटर तर येळावी मंडलामध्ये सर्वात कमी सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मांजर्डे मंडलात ३२ मिलीमीटर, सावळज मंडलात १९ मिलीमीटर, तासगाव मंडलात नऊ मिलीमीटर तर मणेराजुरी मंडलात सात मिलीमीटर पाऊस झाला आहे. जूनअखेरीस तालुक्यात सरासरीच्या २२ टक्के पावसाची नोंद झाली.
जुलैअखेर ११४ मिलीमीटर
जुलै महिन्यात ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तासगाव मंडलामध्ये सर्वाधिक ११७ मिलीमीटर तर मांजर्डे मंडलात सर्वात कमी ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विसापूर मंडलात १०५ मिलीमीटर, सावळज मंडलात ९२ मिलीमीटर, येळावी मंडलात ७८ , मणेराजुरी मंडलात ७१ मिलीमीटर पाऊस पडला. जुलैच्या अखेरीस तालुक्यात ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस जुलैअखेरच्या सरासरी पावसाच्या ५१ टक्के होता.
ऑगस्टमध्ये पाठ फिरवली
ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने पाठ फिरवली. या महिन्यात तालुक्यात फक्त १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तासगाव आणि मणेराजुरी या दोन मंडलात प्रत्येकी १३ मिलीमीटर, सावळज आणि मांजर्डे मंडलात १२ मिलीमीटर, येळावी मंडलामध्ये ९ मिलीमीटर तर विसापूर मंडलामध्ये फक्त ५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात ऑगस्ट अखेर १२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ऑगस्ट अखेरच्या सरासरी पावसाच्या ४० टक्के एवढा आहे.
ऑगस्ट अखेरचा तालुक्यातील सरासरी आणि प्रत्यक्ष पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये
महिना सरासरी पडलेला टक्केवारी
पाऊस पाऊस
जून ११४ २५.७० २२ टक्के
जुलै १०६ ८८.८३ ८३ टक्के
ऑगस्ट ८६ १०.७० १२ टक्के
एकूण ३०६ १२५.२३ ४० टक्के