गोळीबार करून ज्येष्ठ नागरिकाकडून 40 हजार रुपये केले लंपास; नांदेड शहरातील घटना

बँकेतून काढलेले 40 हजार रुपये दोघांनी गोळीबार करून लंपास केल्याची घटना शहरातील अष्टविनायकनगर भागात मंगळवारी सायंकाळी घडली. सेवानिवृत्त कर्मचारी रवींद्र जोशी (वय 68) हे अष्टविनायकनगर भागात राहतात.

    नांदेड : बँकेतून काढलेले 40 हजार रुपये दोघांनी गोळीबार करून लंपास केल्याची घटना शहरातील अष्टविनायकनगर भागात मंगळवारी सायंकाळी घडली. सेवानिवृत्त कर्मचारी रवींद्र जोशी (वय 68) हे अष्टविनायकनगर भागात राहतात. मंगळवारी सायंकाळी ते नजीकच्या बँकेत गेले होते. बँकेतून त्यांनी 40 हजार रुपये काढून घरी परतले.

    घराच्या गेटजवळ ते असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी प्रथम अडवून जोशी यांच्या हातातील बॅग लंबविण्याचा प्रयत्न केला. जोशी यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दोघांपैकी एकाने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातील एक जोशी यांच्या हाताजवळून, दुसरी पाया जवळून गेली. यात जोशी बालंबाल बचावले. ते जखमी झाले.

    या घटनेत त्यांच्याकडील सुमारे 40 हजार रुपये आणि मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे. पाळत ठेवून चोरट्यांनी हा प्रकार घडविला असावा, असा अंदाज पोलिस सूत्रांनी व्यक्त केला. जखमी जोशी यांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.