संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

भंडारा येथील सामाजिक न्याय भवनाच्या बांधकामाला (Building Construction) जवळपास 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आजतागायत या इमारतीची दुरूस्ती व रंगकाम झालेले नाही. इमारतीवर अनेक ठिकाणी भेगा व फरशा उखडलेल्या आहेत. येथील शौचालयाची दुरावस्था अत्यंत बिकट आहे.

    भंडारा : भंडारा येथील सामाजिक न्याय भवनाच्या बांधकामाला (Building Construction) जवळपास 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आजतागायत या इमारतीची दुरूस्ती व रंगकाम झालेले नाही. इमारतीवर अनेक ठिकाणी भेगा व फरशा उखडलेल्या आहेत. येथील शौचालयाची दुरावस्था अत्यंत बिकट आहे. या इमारतीच्या रंगरंगोटीसाठी मागील वर्षी 44 वर्षांचा प्रस्ताव राज्य शासनाला (Maharashtra Government) पाठविण्यात आला होता. मात्र, एक वर्षाचा कालावधी लोटूनही हा प्रस्ताव धूळखात पडलेला आहे.

    गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या इमारतीच्या 44 लाख रुपये दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाठविण्यात आला होता. मात्र, सरकारने या प्रस्तावावर कोणताही विचार न केल्याचे दिसून येत आहे. वास्तविक, इतक्या कमी रकमेत या इमारतीची दुरुस्ती करणे शक्य नाही. म्हणून दुसरा प्रस्ताव तयार करून तो पाठविण्याची गरज भासू लागली आहे.

    भंडारा येथील सामाजिक न्याय भवन हे एकेकाळी सुंदर आणि उत्कृष्ट इमारतीचे मॉडेल मानले जायचे. संपूर्ण राज्यात एक प्रकारच्या डिजाइनच्या इमारतीचे बांधण्यात आले आहे. मात्र, भंडारा येथील इमारतीची स्थिती इतक्या लवकर एवढी वाईट होईल याची कल्पना कुणाला नव्हती. राज्य शासनाकडून दुरुस्तीसाठी निधी न मिळाल्याने या देखण्या वास्तूला वाईट दिवस पहावे लागत आहे.

    घुमट ताडपत्री झालेला

    सामाजिक न्याय भवनाच्या गुंबद असलेल्या सभागृहाची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. पावसाळ्याच्या दिवसात या सभागृहात पाणी टपकत आहे. सभागृहात पाणी येऊ नये यासाठी गुंबद ताडपत्रीने झाकण्यात आला आहे. ताडपत्रीचा आधार असलेल्या गुंबद व इमारतीच्या दुरूस्तीसाठी 44 लाख रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.