4th Maharashtra State Road Cycling Championship at Baramati from 22nd December 4th Maharashtra State Road Cycling Championship to start from 22nd December Pune, Cycling Association of Maharashtra and Krida Jagruti have jointly organized the 4th Maharashtra State Road Cycling Championship. The tournament will be held at Baramati from 22nd to 24th December. Giving more information about the competition, CFI Vice President Pratap Jadhav said that the selection of cyclists from the Maharashtra team in the upcoming 28th National Road Cycling Championship to be held in Vijaypur (Karnataka) will also be done from this State Road Cycling Championship. This national competition will be held from 9th to 13th January 2024 at Bijapur (Karnataka). This State Road Cycling Championship will be held in Youth Boys and Girls (12 to 14 years age group), Sub Junior Boys and Girls (15 and 16 years age group), Junior Boys and Girls (17 and 18 years age group), Elite Men and Women (19 years and above) and men under 23 years (Men Under 23 age group) will be held in total nine age groups. In this, a total of 174 cycle paths have confirmed their participation for this competition, which is held in two categories, namely Individual Time Trial and Mass Start / Road Race. The tournament is co-sponsored by Indian Oil Corporation. International medalist Pooja Danole of Cycle Pattu Kolhapur is the highlight of the event, national medalist and international medalist in MTB cycling, Pranita Soman of Pemraj Sarada College of the city, Ritika Gaikwad of Nashik, Ranjita Ghorpade of Kolhapur, Radhika Darade of Baramati, Snehal Mali of Navi Mumbai, Aditi of Pune Sports Prabodhini. Dongre, Jalgaon's Akanksha Mhetre along with national medalist Surya Thattu of Pimpri Chinchwad, Pune's Adeep Wagh, Pranav Kamble, Mumbai city's Vivan Sapru, Nagpur's Tejas Dhande have confirmed their participation in the men's event. The competitions will be held on the newly constructed Jagadguru Sant Tukaram Maharaj Palkhi Marg in Baramati, a distance of about 7 km from Dymex Company neighborhood to Limtek village. Athletes are eligible for jobs through these state and national road cycling championships, all other government concessions are available to cyclists only on the basis of performance in this competition, promotion/salary hike of the athletes who have jobs are based on their performance in the competition, so these competitions are very important for cyclists. are There is a Competition Director of this competition and International Umpire Sudam Rokade from Navi Mumbai will act as the Chief Referee while Dipali Patil, Dharmender Lamba, Uttam Nale, Milind Zodge, Sainath Thorat etc. will act as Time Management/Decision Referees, Umpires and Pilots. are

  पुणे : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती संयुक्तरीत्या चौथ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत बारामती येथे होणार आहे.
  महाराष्ट्र संघामधील सायकलपट्टूंची निवड
  स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना सीएफआयचे उपाध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले की, आगामी विजयपूर (कर्नाटक) येथे होणाऱ्या २८व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघामधील सायकलपट्टूंची निवड सुद्धा या राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमधून करण्यात येणार आहे. हि राष्ट्रीय स्पर्धा ९ ते १३ जानेवारी २०२४ दरम्यान विजापुर (कर्नाटक ) येथे  होणार आहे.
  १७४ सायकलपट्टूंनी आपला सहभाग निश्चित
  ही राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा युथ मुले व मुली (१२ ते १४ वर्षे वयोगट), सब ज्युनिअर मुले व मुली (१५ आणि १६ वर्षे वयोगट), ज्युनिअर मुले व मुली (१७ आणि १८ वर्षे वयोगट), ईलीट पुरुष व महिला (१९ वर्ष आणि त्यापुढील वयोगट) आणि २३ वर्षाखालील पुरुष (मेन अंडर२३ वयोगट) अशा एकूण नऊ वयोगटात होणार आहे. यामध्ये इंडीव्युजल टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट / रोड रेस अशा दोन प्रकारात होणा-या या स्पर्धेसाठी पुरुष-महिला आणि मुले-मुली मिळून एकूण १७४ सायकलपट्टूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी या स्पर्धेला सहप्रयोजित केले आहे.
  कोल्हापूरची पूजा दानोले ही या स्पर्धेचे आकर्षण
  आंतरराष्ट्रीय पदकविजेती सायकलपट्टू कोल्हापूरची पूजा दानोले ही या स्पर्धेचे आकर्षण असून राष्ट्रीय पदक विजेती व एमटीबी सायकलिंग मधील आंतरराष्ट्रीय पदक विजेती, नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाची प्रणिता सोमन, नाशिकची  ऋतिका गायकवाड, कोल्हापूरची रंजीता घोरपडे, बारामतीची राधीका दराडे, नवी मुंबईची स्नेहल माळी, पुणे क्रीडा प्रबोधिनीची आदिती डोंगरे, जळगावची आकांक्षा म्हेत्रे यांच्यासह पुरुषामध्ये राष्ट्रीय पदक विजेता पिंपरी चिंचवडचा सुर्या थात्तु, पुण्याचा अदीप वाघ, प्रणव कांबळे, मुंबई शहरचा विवान सप्रु, नागपुरचा तेजस धांडे यांनी या स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला आहे.
  ७ किमी अंतराच्या मार्गावर या स्पर्धा
  बारामती येथे नव्यानेच तयार झालेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर डायमेक्स कंपनी शेजारुन लिमटेक गावाच्या दिशेला जाणा-या सुमारे ७ किमी अंतराच्या मार्गावर या स्पर्धा होणार आहेत. या राज्य आणि राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमधून खेळाडू नोक-यांसाठी पात्र ठरत असतात, शासनाच्या इतर सर्व सवलती केवळ या स्पर्धेमधील कामगिरीवरुनच सायकलपट्टूंना मिळत असतात, नोक-या असणा-या खेळाडूंना बढती / पगारवाढ या स्पर्धेमधील कामगिरीवरुन ठरत असते म्हणून सायकलपट्टूंच्या दृष्टीने या स्पर्धा अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
  या स्पर्धेचे स्पर्धा संचालक (Competition Director) आहेत तर मुख्यपंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच नवी मुंबईचे सुदाम रोकडे,  काम पहणार आहेत तर दिपाली पाटील, धरमेंदर लांबा, उत्तम नाळे, मिलींद झोडगे, साईनाथ थोरात इत्यादी वेळ व्यवस्थापन/निर्णय पंच, पंच आणि पायलेट म्हणून काम पाहणार आहेत.