पुणे उत्तमनगर परिसरात वाईन्स शॉपवर दरोडा; वर्ल्ड कप फायनचा चोरट्यांनी घेतला फायदा, 24 तासांच्या आत पोलिसांकडून आरोपींना अटक

    पुणे : राज्यात सगळीकडे आयसीसी फायनलचे वेध लागलेले असताना, लोकं भारत विरुद्ध अॉस्ट्रेलिया फायनल मॅच पाहण्यात दंग  होते. याचाच फायदा घेत पुणे शहरातील उत्तमनगर परिसरात एका वाईन्स शॉपवर चोरट्यांनी दरोडा टाकून 3 लाख 90 हजारांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. उत्तमनगर पोलिसांनी 24 तासांच्या आत या आरोपींना जेरबंद केले आहे. सर्व आरोपींना माणीबाग, धायरी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

    रोख रकमेसह हत्त्यारे जप्त

    उत्तमनगर पोलिसांनी आरोपींकडून रोख 3 लाख 90 हजार जप्त केले आहेत. तसेच, गुन्ह्यात वापरण्यात आलेले गावठी कट्टा, लोखंडी कोयता, तलवार, सत्तूर ही हत्यारेदेखील आरोपींकडून जप्त केली आहेत.

    पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची कामगिरी

    या तपासात मा. पोलीस आयुक्त रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील, पोलीस आयुक्त सुहेल शर्मा, वरिष्ठ पो. नि. किरण बालवडकर यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली.