यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालय रॅगिंग प्रकरणी 5 डॉक्टरांचं निलंबन!

दव्युत्तरच्या पहिल्या वर्षाला असलेल्या डॉ.अनमोल प्रदीप भामभानी याचा सिनिअर्सकडून छळ झाल्याची तक्रार त्याची आई जुही भामभानी यांनी केली होती. या प्रकरणी महाविद्यालयात पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमाला असणाऱ्या 5 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

    यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Yavatmal Medical College) रॅगिंग प्रकरणी (Ranging ) 5 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रॅगिंगमुळे या डॉक्टर विद्यार्थ्याला सेलुलायटिस हा दुर्धर आजार जडल्याचा दावाही तक्रारीतून करण्यात आला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपातील यांनी चौकशी समिती नेमली आहे.

    काही दिवसांपूर्वी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगची एक तक्रार नोंदविण्यात आली होती. पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षाला असलेल्या डॉ.अनमोल प्रदीप भामभानी याचा सिनिअर्सकडून छळ झाल्याची तक्रार त्याची आई जुही भामभानी यांनी केली होती. या प्रकरणी महाविद्यालयात पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमाला असणाऱ्या 5 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई (Action Of Suspension) करण्यात आलेली आहे. डॉ अमोल भामभानी यांच्या रॅगिंग प्रकरणी त्याची आई जुही भामभानी यांनी अधिष्ठाताकडे तक्रार दिली होती. यावरून अधिष्ठाता मिलिंद फुलपाटील यांनी या तक्रारीनुसार, डॉ. ओमकार कवितके, डॉ. अनुप शाह, डॉ. साइलक्ष्मी बानोत, डॉ. प्रियांका साळुंके, डॉ. पी. बी. अनुषा या 5 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

    या प्रकरणासंदर्भात नाशिक आरोग्य विद्यापीठाची 5 सदस्यीय टीम सोमवारी यवतमाळमध्ये येणार असून पुढील चौकशी करणार आहे. रॅगिंगमुळे या डॉक्टर विद्यार्थ्याला सेलुलायटिस हा दुर्धर आजार जडल्याचा दावाही तक्रारीतून करण्यात आला आहे.