गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची 5 लाखांची फसवणूक; आरोपींवर गुन्हा दाखल

गुंतवणुक करण्याच्या आमिषाने महिलेची 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पुणे : गुंतवणुक करण्याच्या आमिषाने महिलेची 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार झेऊर रेहमान आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    आरोपी झेऊर रेहमान हा फिक्शन फिटनेस जिमचा मालक आहे. तक्रारदार महिलेची आरोपी झेऊरशी ओळख झाली होती. जिममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्याने दाखविले. गुंतवणुकीच्या आमिषाने त्याने महिलेकडून 5 लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याने महिलेला परतावा दिला नाही.

    महिलेने याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहेत.