
यवतमाळ येथे राहणारे राजेंद्र हेंडवे यांच्या मुलीने राजेंद्र नाईक यांच्या मुलासोबत लग्नाचा बनाव केला. लग्नाच्या बनावाकरीत हेंडगे कुटुंबीयांनी कारस्थान रचून चार लाख रुपये वसूल केले. मुलीचे लग्न तुटल्याने चिडून जाऊन राजेंद्र नाईक यांच्याविरुद्ध खोटा रिपोर्ट देतो. आमची मुलीची बाजू आहे, असे म्हणून तुमच्या विरुद्ध रिपोर्ट द्यायचा नसेल तर १० जून पर्यंत पाच लाख रुपये द्या ! अशी धमकी दिली.
पुसद : येथील मंगलमूर्ती नगरात राहणाऱ्या व्यक्तीला यवतमाळ येथील मुलीकडच्या मंडळींनी लग्नाचे आमिष दाखवून चार लाख रुपयांची फसवणूक केली. एव्हढेच नव्हे तर आमची मुलीकडची बाजू असल्याचे सांगून खोटा रिपोर्ट देऊ, अशी धमकी देत ५ लाखांची खंडणी मागितली. हा धक्कादायक प्रकार पुसद येथे उघडकीस आला आहे. यामध्ये यवतमाळ येथील सहा जणांविरोधात पुसद शहर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राजेंद्र नागोराव हेंडवे (६५) रा. यवतमाळ व त्यांच्या पाच कुटुंबीयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राजेंद्र शामराव नाईक (६०) वर्षे रा. मंगलमुर्ती नगर यांनी दारव्हा मार्गावर राहणाऱ्या हेडाऊ कुटुंबा विरोधात तक्रार दिली आहे. शहर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ येथे राहणारे राजेंद्र हेंडवे यांच्या मुली सोबत राजेंद्र नाईक यांच्या मुलाच्या लग्नाचा बनाव केला. लग्नाचा बनवाकरीत हेंडगे कुटुंबीयांनी कारस्थान रचून चार लाख रुपये वसूल केले.
मुलीचे लग्न तुटल्याने चिडून जाऊन राजेंद्र नाईक यांच्याविरुद्ध खोटा रिपोर्ट देतो. आमच्या मुलीची बाजू आहे, असे म्हणून तुमच्या विरुद्ध रिपोर्ट द्यायचा नसेल तर १० जून पर्यंत पाच लाख रुपये द्या ! नाहीतर सर्वांना खोट्या गुन्ह्यात फसवतो, असे म्हणून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. तशी पिडीताने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.