5 lakh recovered from water bill arrears! Municipal Corporation's water supply department took action

महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपट्टी थकबाकीदारकांनी पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले होते. त्याचबरोबर अवैध नळजोडण्या ४०० रुपयांत वैध करण्यासाठी नऊ महिने अभय योजना राबविली. या योजनेत हजारो नागरिकांनी आपल्या नळजोडण्या वैध केल्या, मात्र अद्यापही हजारो नळजोडण्या अवैध आहेत.

    अकोला : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणीपट्टी थकबाकीदारांची नळजोडणी खंडीत करण्यासाठी पथक गेले, असताना एकूण नऊ पाणीपट्टी थकबाकीदारांनी पाणीपट्टीचा भरणा केला. परिणामी, महापालिकेला एकाच दिवशी पाच लाख रुपयांचा महसूल वसूल करता आला.

    महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपट्टी थकबाकीदारकांनी पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले होते. त्याचबरोबर अवैध नळजोडण्या ४०० रुपयांत वैध करण्यासाठी नऊ महिने अभय योजना राबविली. या योजनेत हजारो नागरिकांनी आपल्या नळजोडण्या वैध केल्या, मात्र अद्यापही हजारो नळजोडण्या अवैध आहेत. त्यामुळेच ३१ मार्चनंतर अवैध नळधारक आणि पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई केली जाईल, असे संकेत पाणी पुरवठा विभागाने दिले होते. या अनुषंगाने पाणी पुरवठा विभागाने पाणीपट्टी थकबाकीदार आणि अवैध नळजोडणी धारकांवर कारवाई सुरु केली आहे.

    सिव्हील लाईन रोडवरील वाणिज्य वापर असलेल्या पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला संबंधितांनी पाणीपट्टीचा भरणा केल्याने खंडीत करण्याची कारवाई स्थगित केली. ही मोहिम जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच. जी. ताठे, कनिष्ठ अभियंता संदीप चिमणकर, रामेश्वर दौड, सुबोध वानखडे, शैलेश गव्हाणकर, संदीप डोंगरे, सचिन चव्हाण, अंभारे, अंकुश राठोड, राजू मांजरे यांनी राबविली. दरम्यान ज्या नागरिकांकडे लाखो रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. तसेच, ज्या नागरिकांकडे अवैध नळजोडणी आहे. त्यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात संपर्क करुन थकीत पाणीपट्टीचा भरणा करावा. तसेच, अवैध नळजोडणी वैध करुन घ्यावी, अन्यथा संबंधितांची नळजोडणी खंडीत केली जाईल, असा इशारा पाणी पुरवठा विभागाने दिला आहे.